ख्रिश्चन बांधवांच्या समस्यांचे निवारण करू : मुख्याधिकारी काळे यांच्याकडून आश्वासन…..

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी

गेल्या अनेक दशकांपासून शिरूर शहरातील ख्रिश्चन धर्मीय लोकांना त्यांचे संस्कृतीत आणि धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी संपूर्ण शिरूर शहरांमध्ये कुठेही तरतूद केलेली नाही. त्याचबरोबर सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी समाज बांधवांना एकत्रित करून मीटिंग घेण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नाही किंवा एखादे सांस्कृतिक भवन देखील नाही ही खूप शोकांतिका आहे.

तसेच ख्रिश्चन दफनभूमी मध्ये धार्मिक परंपरा नुसार अंत्यविधी करण्यासाठी शेवटच्या प्रार्थनेसाठी कुठेही एकत्र थांबण्याची किंवा विधी करण्याची सोय केलेली नाही . ख्रिश्चन दफन भूमी मध्ये भरपूर मोठ्या प्रमाण मध्ये रानटी झाडांचे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी समस्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने, शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांना निवेदन देऊन याच्यावर निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली.

यावेळी समजाच्या वतीने प्रतीनेधिक स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर तालुका उपाध्यक्ष अल्पसंख्य विभाग युवराज सोनार , संतोष खोतकर , महेश शिंदे , सुनील बरे , फ्रान्सिस महंकाळे ,प्रविण कदम , संतोष गोरखे, गणेश वद्दे ,कमल साळवे ताई , शीला ताई खोतकर , अश्विनी शिंदे ताई , शोभा ताई बरे, कणसे ताई , गायकवाड ताई , भालेराव ताई , बलखंडे ताई, सपोरे ताई व इतर असे अनेक ख्रिस्ती समाजातील लोक उपस्थित होते.

त्यावर शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी लवकरात लवकर या समस्येचे निराकरण केले जाईल असे संपूर्ण समाजाला आश्वासन दिले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 7 8 4 1
Users Today : 23
Users Yesterday : 115