Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी राहुल चातुर

Facebook
Twitter
WhatsApp

 

बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेची कार्यकारणी जाहीर

पुणे प्रतिनीधी : सागर पवार 

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात राहुल चातुर यांची बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली असल्याची माहिती केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सचिन बेंडभर यांनी नुकतीच दिली.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम अण्णा भोंडवे यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेची नूतन कार्यकारणी तयार करण्यात आली. यात अध्यक्ष राहुल चातुर, कार्याध्यक्ष संजीव मांढरे, उपाध्यक्ष गुरुनाथ पाटील, प्रमुख कार्यवाह विवेकानंद फंड, कोषाध्यक्ष संभाजी चौधरी, सहकार्यवाह सुनील हरगुडे, प्रमुख सल्लागार उत्तम अण्णा भोंडवे तर कार्यकारणी सदस्य प्राध्यापक कुंडलिक कदम, मनोहर परदेशी, मारुती कदम, शेखर फराटे आणि प्रशांत सासवडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सचिन बेंडभर यांनी दिली.

बालकुमारांसाठी विविध स्पर्धांचे तालुक्यातआयोजन

शिरूर तालुक्यात बालकुमारांसाठी निबंध, वक्तृत्व, काव्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कमेसह बक्षीस देण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे शिरूर शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल चातुर यांनी सांगितले.

 

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शिरूर शाखेच्या अध्यक्षपदी राहुल चातुर यांची निवड झाल्याबद्दल साहित्य संस्थेतर्फे सत्कार करताना पदाधिकारी.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21