पुण्याच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोबत बैठक

Facebook
Twitter
WhatsApp

 

पुणे प्रतिनिधी : सागर पवार
पुण्याच्या विविध प्रश्नांबाबत आज केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. अमितजी शाह यांच्यासोबत गृहमंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल कार्यान्वित करणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. हे दोन्ही विषय मा. अमितजींच्या अखत्यारित असून त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर तातडीने या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल लवकरच सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली असून त्यासाठी आवश्यक असलेल्या सीआयएसएफच्या मनुष्यबळाची पूर्तता लवकरच गृहविभागाकडून करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला आहे. यामुळे नवे टर्मिनल सुरू करण्याला गती प्राप्त झाली आहे. हे टर्मिनल लवकर सुरू करून पुणेकर प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.

पुणे महापालिकेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून येणारा निधी गेली काही काळ प्रलंबित होता. शहरातील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन व पूर नियंत्रणासाठी हा निधी तत्काळ मिळावा, अशी मागणी बैठकीत केली. त्यावरही मा. अमित शाह जी यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 7 8 4 1
Users Today : 23
Users Yesterday : 115