श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत 72 विद्यार्थी दत्तक…

Facebook
Twitter
WhatsApp

 

 

पुणे प्रतिनिधी  :

पुणे शहराचा मानाचा पहिला श्री कसबा गणपती तर्फे विद्यार्थी दत्तक योजना दर वर्षी राबविण्यात येते यंदा ही श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजना 2024 राबविण्यात आली असून 72 गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले आहे. श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजना 2024 कार्यक्रम 9 जून 2024 रोजी रविवारी संपन्न झाला.

या कार्यक्रमात श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजनेत 72 गरजू विद्यार्थ्यांना फी आणि स्टेशनरीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निवेदिता एकबोटे (उपकार्यवाहक पीईएस सोसायटी, पुणे) उपस्थित होत्या. ह्या योजने अंतर्गत उत्तम उपक्रम राबवत अनेक गरजू विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे योग्य ती मदत करत आहात असे सांगत डॉ निवेदिता मॅडम नी देखील मदतीचा हात पुढे केला. मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. तसेच उपाधक्ष सूरज गाढवे, निलेश वकील, अनिल पानसे, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्तमरीत्त्या पार पडला. 72 विद्यार्थ्यांना फी आणि स्टेशनरी वाटप केले असून नंदादीप हायस्कूल (पार्वती पायथा), विमलाबाई गरवारे, रमणबाग, मॉडर्न मराठी मिडीयम, अहिल्यादेवी प्रशाला, महर्षी कर्वे प्रशाला युनिव्हर्सिटी शाखा, आपटे प्रशाळा, दामले प्रशाला, रेणुका स्वरूप) अशा 10 शाळा सहभागी झाल्या होत्या.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 7 8 4 1
Users Today : 23
Users Yesterday : 115