शिरूर प्रतिनिधी: दतात्रय कर्डिले
दिनांक २७ मे २०२४ रोजी सकाळी ११ च्या सुमारास गोरक्षक विशाल शिंदे हे रांजणगाव वरुन, शिरुर कडे येत असताना छोटा हत्ती टेम्पो MH 12 JF 2326 हि गाडी गोवंश भरुन शिरुर च्या दिशेने येत असताना दिसली. त्यांना संशय आल्याने विलंब न करता त्यांनी ही सर्व माहिती त्यांचे सहकारी बजरंग दलाचे जिल्हा सहप्रमुख अजिंक्य तारू यांना सांगितली . अजिंक्य तारू यांनी तातडीणे पुढे रांजणगाव पोलिस स्टेशन ला कॉल द्वारे ही माहिती कळवत ,यश ईन चौकात सापळा रचून पोलिस मदतीने वरील गाडी पकडली असता,गाडीमध्ये १ गावरान गाई व ४ वासरे दाटीवाटीने भरलेले दिसली.
गाडी चालकाकडे विचारपुस केली असता, गाई व वासरे, कत्तली साठी घेऊन जात असल्याचे कळताच ,गौरक्षकांनी पोलिस मदतीने त्वरीतगाडी पकडली व रांजणगाव पोलिस स्टेशनला गाडी जमा केली.
त्या गाडी ड्रायव्हरसह दोन अरोपींवर गोवंश हत्याबंदी कायदा
कलम 5A(2),5B,9,11 भा.द.वि.३४ अंतर्गत गुन्हा दाखल करुन सदर वाचवलेले ५ गोवंश श्री गौरक्षण पांजरपोळ संस्था शिरुर येथे सुखरुप सोडण्यात आले.
या कारवाईत बजरंग दलाचे गोरक्षक विशाल शिंदे ,प्रतीक शर्मा ,नानासाहेब लांडे बजरंग दल रांजणगाव संयोजक रवी जगदाळे, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक अजिंक्य तारु,गोरक्षक विशाल पवार,अदित्य सणसे,रवींन्द्र बैनाडे,लोकेश शर्मा,रोहीत दरडा,इ गोरक्षकांनी मदत केली.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी रांजणगाव पोलिस स्टेशनचे पी.आय.वाघमोडे व पी. एस. आय सविता काळे यांचे विशेष सहकार्य केले.
