शिरूर प्रतिनिधी:
दि.14/05/2024 रोजी संभाजी महाराजांच्या जयंतीचे अवचित्य साधत , स्वराज्य रक्षक फाउंडेशन व रामलिंग ग्रामपंचायत यांच्या वतीने दिनांक सहा मार्च पासून कापडी पिशव्या प्रशिक्षण रामलिंग रोड, शिक्षक कॉलनी येथे सुरू करण्यात आले होते. त्या प्रशिक्षणाचा निरोप समारंभ व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या प्रशिक्षण मध्ये जवळ जवळ 50 महिलांनी आपला सहभाग नोंदवत, वेगेगळ्या प्रकारच्या जवळजवळ 25 प्रकारच्या, नावन्यपूर्वक बॅगा शिवल्या.
यात निता धपाटे या प्रशिक्षण घेणाऱ्या महिलेने हातावर बॅगा शिवण्यास सुरू करत , नंतर मशीनवर बॅगा शिवत , बॅगा विकून पैसे हि कमविले, तर मस्के मावशी नी , शिकण्याला वय नसते हे सुंदर सुंदर बॅगा शिवत दाखऊन दिले.
स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे संचालक रवी लेंडे , प्रथमेश चाळके , पियूश वेदपाठक यांनी बॅगा प्रशिक्षण घेणाऱ्या या महिलांमधून चांगल्या व आकर्षक बॅगा शिवणाऱ्या तीन महिलांना ट्रॉफी देत , त्यांच्या शिकण्याच्या प्रयत्नांचे विशेष असे कौतुक केले. यामध्ये तिसरा नंबर स्वाती संतोष ताम्हाणे, दुसरा ममता अंबुले तर पहिला निता धापाटे यांना देण्यात आले तर यामध्ये प्रगती चाळके सविता , साळके यशोदा अहिरे , सोनाली दुधाने , अर्चना येवले , मोनिका वाडेकर , कमल शेळके , मनीषा थोरवे , कृतिका भांड , शितल माने , वर्षा भाकरे , ज्योती पाटील , सविता पवार , मनीषा घुले , राजश्री शंभूदास , वैष्णवी सोनवणे , सारिका सावळे , ज्योत्स्ना पाटील , गायत्री चौधरी , नीलम रासकर , पूनम सूर्यवंशी , शितल पुतगाने , विजया मस्के , प्रियंका गायकवाड , सविता शेवाळे , अंजली गव्हाणे , या व इतर अनेक महिलांनी सहभाग घेत , बॅग प्रशिक्षण पूर्ण केले.
मनीषा वाळुंज यांनी या महिलाना बॅग प्रशिक्षण दिले तर प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवी लेंडे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नम्रता गवारे या उपस्थित होत्या. यावेळी रवी लेंडे यांनी महिलाना मार्गदर्शन केले.
