लोणीकंद प्रतिनिधी :
नुकतेच थेऊर लोणीकंद रोडचे काम नव्याने झालेले आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी तीव्र वळण व उतार रोडला देण्यात आलेले आहेत, वास्तविक पाहता अशा रोड वर स्पिडबेकर लावणे गरजेचे आहेत, असाच काही प्रकार जोगेश्वरी मंदिरासमोर पहावयास मिळत आहे, तीव्र उतार असूनही स्पीड ब्रेकर न लावल्याने त्याठिकणी मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसत आहेत .
त्याचप्रमाणे जोगेश्वरी मंदिरा समोरील याच एक तीव्र वळणअसणाऱ्या रोडवर मोठ्याप्रमाणात अपघात होत आहेत व त्याठिकाणी जीव गमावले गेले आहेत.
माघील आठवड्यात नुकताच एका इको गाडीचा व कंटेनरचा अपघात झाला होता व त्यामध्ये चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.
- याच रोडचे काम चालू असताना चंद्रकांत वारघडे यांनी अनेक वेळा वळण सरळ करण्याची विनंती केली, परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला ,तरीसुद्धा थोड्याफार प्रमाणात सरळ केला. परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी संरक्षक जाळी लावल्यामुळे वाहनांना वळणावर वाहण चालवताना कसरत करावी लागत आहे आणि त्यातून अपघात घडत आहेत.
त्यामुळे वारघडे यांनी सम्मदित विभाग त्यामध्ये,राज्याचे मुख्य सचिव, बांधकाम सचीव, मुख्य कार्यकारी अभियंता बांधकाम, जिल्हा अधिकारी,पिएम आर डी आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त, पूणे वाहतूक पोलीस आयुक्त, लोणिकंद पोलिस निरीक्षक, उपवनसंरक्षक पुणे, वनपरिक्षेत्र अधिकारी हवेली यांना या विषयावर निवेदन दिले आहे व जर यावर ताबडतोब पर्याय काढला नाही तर तिव्र आंदोलन करणार असल्याचे वारघडे यांनी सांगितले.
वनविभागाचे अधिकारी यांनी सार्वजनिक रस्त्यावर फिरल तर चालते, मग सर्वसामान्य नागरिकांना वेगळा न्याय का? त्यांनी वनविभागाचे जागेतून का जायचे नाही? हा कुठला न्याय ?जर वनविभागाने अशाप्रकारे आडमुठेपणा ची भुमिका घेतली तर माहिती सेवा समितीचे कार्यकर्ते वनविभागाची एकही गाडी रस्त्यांवर फिरू देणार नाही, याची नोंद सम्मदित विभागाने घ्यावी व ते वळण काढण्यासाठी विना अट सहकार्य करावे, असे निवेदन चंद्रकांत गोविंद वारघडे यांनी दिले आहे.
