पुणे प्रतिनिधी:
सातारा/जीवन मोहिते-द युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याची सातारा जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जिल्हाध्यक्ष जीवन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली.
सातारा जिल्हाउपाध्यक्षपदी अनिल करंदकर,जिल्हा सचिवपदी चेतन भोसले. जिल्हाकार्याध्यक्ष पदी चंद्रशेखर जाधव तर जिल्हा संपर्क प्रमुख संदिप माने. यांची निवड करण्यात आली तर सातारा तालुकाध्यक्ष पदी महेश मोहिते यांची निवड करण्यात आली ,
तसेच महिला राज्य अध्यक्ष कल्पना पवार यांच्या सुचनेनुसार सातारा जिल्हा महिला आघाडी जिल्ध्याध्यक्ष म्हणुन अर्चना जगताप यांची निवड करण्यात आली.
संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष जीवन मोहिते यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष जिवण मोहिते म्हणाले की सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर करून पत्रकारांना एकजूट करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांच्या संकल्पनेनुसार व सूचनेनुसार पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेमार्फत विशेष प्रयत्न केले जातील असे मत व्यक्त केले.
निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांनी सातारा जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारणी व तालुका अध्यक्षांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सातारा जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
