पुणे प्रतिनिधी : सागर पवार
हिंदू नववर्ष व गुढीपाडवा निमित्त जनसेवा न्यास हडपसर आयोजित भव्य महिला दुचाकी रैली मधे स्मितसेवा फाऊंडेशन च्या सौ स्मिता गायकवाड यांच्यामार्फत हडपसर गाव, रुपाली मेडिकल समोर, रासगे अळी येथे भव्य स्वागत करण्यात आले व सर्वांनी रैली मधे सहभाग घेतला.
या रॅली मधे मराठी नायक उमेश कामत आणि नायिका सोनाली खरे हे देखील सहभागी झाले होते..
बाभुळसर बू!ते मारुती शंकर नागवडे वस्ती,जगताप पाटी रस्त्यासाठी ३०लक्ष रुपये मंजूर…
यावेळी स्मितसेवा फाऊंडेशनच्या कराटे क्लास मधील अनेक लहान मुलांनी व महिलांनी फुलांची उधळण करून जय श्री रामचे नारे देऊन रैली चे स्वागत केले.. यावेळी सौ पल्लवी केदारी, सौ श्रीदेवी कानीकरी, सौ मंगल अडवल, सौ शर्मिला डांगमाळी, सौ प्रभावती भूमकर, गोविंदजी कंगने, डॉ. अशोक सोरगावी, श्री गिरीश बागलकोटकर, श्री काशिनाथ भुजबळ, कु. मेघना, कु. साक्षी, कु. खुशी, कु. सपना व इतर स्मितसेवा फाऊंडेशन सदस्य व मैत्रिणी उपस्थित होत्या..
या कार्यक्रमासाठी जनसेवा न्यास चे माधव राऊत, चेतन कुलकर्णी, भूषण तुपे, सौ मेनका उमडेकर, सौ युगंधरा घाटे, सौ मैत्रेयी सहस्त्रबुद्धे, सौ तृप्ती पानट, सौ अनुराधा कुलकर्णी, श्रीकांत ननावरे, योगेश पावले, अभिषेक टिळेकर यांनी मेहनत घेतली..
