शिरूर प्रतिनिधी:
शिरूर शहरात घडलेल्या आत्महत्या प्रकरणात दोन दिवस उलटून गेले तरी पोलिस प्रशासन आरोपीची नावे सांगण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे,अनेक चर्चांना उधाण आले आहे.
शिरूर शहरातील सावकारामुळे आत्महत्या:पोलिस प्रशासन का गप्प?की..

संजय बलदोटा यांनी काही लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते,त्यात त्यांनी परत केल्याची चर्चा आहे,तरी ही खाजगी सावकरानचा छळ चालू असल्याने,त्यांना तो सहन करणे अशक्य झाल्याने त्यांनी २६/११ रोजी आत्महत्या केली.
विशेष म्हणजे फाशी घेताना त्यांनी एका चिठ्ठीत फाशी घेण्याचे कारण व कोणत्या सावकार व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहोत, हे लिहिले आहे व ती चिठ्ठी,पोलिसांकडे असून ही आरोपी कोण आहेत,हे पोलिस प्रशासन का लपवत आहे?

नक्की कुणाला वाचवणार व कुणाला नाहक यात अडकवून दोषी ठरवणार,याकडे सर्व शिरूर करांचे लक्ष लागले आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे शहरातील चर्चा व अनेक सूत्रांकुंडन मिळालेल्या माहिती नुसार दोन सावकर (आरोपी) शिरूर शहरातील व बाकी तीन आरोपी बाहेरील आहेत.

संपूर्ण शिरूर तालुक्यात आज पर्यंत कुणी ही आत्महत्या केली गेली असेल तर फिर्यादी ने तक्रार नोंदवल्यानंतर आरोपींचे नाव गुप्त ठेवण्यात येत नव्हते,मग शिरूर शहरातील बलदोटा आत्महत्या प्रकरणात,असे का होत आहे?खरच यातील शिरूर शहरात असणारे सावकर पैशाच्या जोरावर नाव लपवण्यात यशस्वी झाले,तसे गुन्ह्यातून ही मुक्त होतील का?
अशा अनेक चर्चांना शिरूर शहरात उधाण येत आहे.





Users Today : 38
Users Yesterday : 80