प्रतिनिधी .संतोष साळुंके
बालकांचे आरोग्य सुरक्षित आणि देशाचे भविष्य निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला वाघोली येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या मोहिमेच्या निमित्ताने आमदार माऊली आबा कटके यांनी वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते बालकास पोलिओ डोस पाजून लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविण्यात आला.

यावेळी आमदार कटके यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधांची पाहणी केली तसेच आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.
“प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बालकांचे आरोग्य, सुरक्षित बालपण आणि पोलिओमुक्त भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.






Users Today : 12
Users Yesterday : 278