शिरूर प्रतिनिधी:
शिरूर शहरातील H P Gas च्या सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. बुकिंग करून ओ टी पी येऊन,बुकिंग पावती देण्यात येत आहे पण सिलेंडर घेण्यासाठी ५ ते ६ दिवसाचा कालावधी सांगितला जात आहे.

शिरूर शहरातील नागरिकांना बुकिंग करून पावती घेऊन ५ दिवसांनी येणे शक्य होऊ शकते,पण बाहेर खेड्या पाड्यातील नागरिकांना ते शक्य होणार नाही. कारण गावातून येताना त्यांनी मोबाईल वर बुकिंग करून, सिलेंडर टू व्हीलर बांधून घेऊन शिरूर च्या H P Gas च्या ऑफिस ला पावती करून लगेच सिलेंडर भरून मिळेल म्हणून आलेले असतात.

शिरूर मधील पुरवठा शाखा किव्हा H P Gas दुगड यांच्या ऑफिस कडून कोणत्याही प्रकारची माहिती प्रकाशित केली गेली नसल्यामुळे हा सिलेंडरचा तुटवडा निर्माण कसा झाला किव्हा ओ टी पी व डिलिव्हरी चा मेसेज पडून ही सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांकडून अनेक शंका निर्माण होत आहेत.

कुठे ही सिलेंडरचा तुटवडा नसताना शिरूर तालुक्यातील खेड्यातील नागरिकांना गॅस सिलेंडर का मिळत नाही? काही काळा बाजार तर होत नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.





Users Today : 12
Users Yesterday : 278