Breaking News
आषाढी एकादशी निमित्त वुमन्स सोशल फाउंडेशन व ओन्ली वुमन्स जिमचा सेवाभावी उपक्रम; शेकडो भाविकांना फराळाचे वाटप दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण पायी दिंडीवारीने शिरूर परिसर भक्तिमय नागरिक ठरले शिक्रापूर पोलिसांचे ‘खरे सहकारी’; सात चोरटे जेरबंद, मदतगार नागरिकांचा सत्कार बाभूळसर बुद्रुक ग्रामपंचायत येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती साजरी. पिंपळसुटी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा पुण्यात जल्लोषात साजरा आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ; यंदा तब्बल १ लाख भाविकांना महाप्रसाद

आषाढी एकादशी निमित्त वुमन्स सोशल फाउंडेशन व ओन्ली वुमन्स जिमचा सेवाभावी उपक्रम; शेकडो भाविकांना फराळाचे वाटप

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वुमन्स सोशल फाउंडेशन, शिरूर व ओन्ली वुमन्स जिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या फराळ वाटप उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वुमन्स सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिया बिरादार यांच्या नेतृत्वाखाली आणि संपूर्ण टीमच्या नियोजनातून हा सेवाभावी उपक्रम भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करून करण्यात आली. त्यानंतर भाविकांना खिचडी, केळी आणि गरम चहा असा फराळ प्रेमपूर्वक वाटप करण्यात आला.

संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. महिलांनी अभंग, भजन आणि विठ्ठलाची गाणी सादर करत भक्तीचा अनोखा रंग चढविला. पारंपरिक फुगड्यांनी कार्यक्रमात सांस्कृतिक आणि भक्तिमय वातावरण अधिक खुलून आले.

या कार्यक्रमाला शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, नगरसेवक सागर नरवडे, अमोल चव्हाण, माजी नगरसेवक संतोष शितोळे, रविंद्र धनक, मराठा महासंघाच्या शोभना पांचगे, आधारछाया फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, डॉ. वैशाली साखरे, भाजपाचे निलेश नवले, डॉ. सरोदे, शिवसेनेचे प्रमोद जोशी यांच्यासह पत्रकार संतोष शिंदे, भगवान मंदिलकर, अर्जुन बढे, सुदर्शन दरेकर, पापाभाई पठाण, शोभा परदेशी तसेच शेकडो भाविक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वुमन्स सोशल फाउंडेशनच्या सदस्या सुजाता पाटील, नीलमधू शर्मा, विजयालक्ष्मी उपाध्याय, जयश्री थिटे, मीराताई परदेशी, रोहिणी बढे, कविता परदेशी, नयना परदेशी, भारती शहाणे आणि सुष्टी करंजुले यांनी विशेष मेहनत घेतली. नियोजन, स्वागत, फराळ वाटप आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी अत्यंत तत्परतेने पार पाडली. महिला वर्गाच्या मोठ्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण आणि भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले.

उपस्थित मान्यवरांनी वुमन्स सोशल फाउंडेशन आणि ओन्ली वुमन्स जिमच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, धार्मिक सणांचे सामाजिक सेवेत रूपांतर करणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा फराळ वाटपाचा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, दरवर्षी वाढत्या उत्साहात आणि मोठ्या संख्येने भाविकांच्या सहभागातून तो अधिक व्यापक होत आहे. सेवा, संस्कार आणि भक्तीचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 4 4 2 6
Users Today : 2
Users Yesterday : 208