प्रतिनिधी. संतोष साळुंके.
मांडवगण फराटा आणि परिसरात जीओ कंपनीची नेटवर्क सेवा काही दिवसांपासून डळमळीत आणि कोलमडलेल्या अवस्थेत आहे.ग्राहक त्यामुळे बहुतांश प्रमाणात त्रस्त आहेत,दिवसातून कित्येक वेळा फोन लागत नाहीत,या परिसरात अगोदरच बिबट्या चे भय मोठ्या प्रमाणात असून अशी काही संकट आली .आणि तत्काळ फोन लावायचा म्हणलं तर रेंज गायब,त्याचप्रमाणे पूरपरिस्थिती मध्ये पण रेंज नसल्याने कुठली माहिती मिळणे शक्य होत नाही सामान्य नागरिकाच्या पर्यंत माहिती पोचण्यासाठी मिडिया एक माध्यम आहे.

अशा वेळेस ही सेवा विस्कळीत झाल्याने लोकांना पूर अथवा पाणी पातळी संदर्भात,अथवा आपत्कालीन सेवा याची अपडेट मिळणे कठीण होत आहे.अशा वेळेस रेंज नसल्याने खूप नागरिकांची गैरसोय होत आहे त्यामुळे बरेचसे ग्राहक पोर्ट करून दुसरे सिम अथवा नेटवर्क घेण्याकडे वळताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी वेळीच तांत्रिक बदल करून किंवा दुरुस्ती करून ग्राहकांना व्यवस्थित सुविधा द्यावी अशी बऱ्याच ग्राहकांची मागणी आहे.




Users Today : 183
Users Yesterday : 94