रायगडावर मांडवगण फराटा येथील राजमाता जिजाऊ शिवकालीन मर्दानी आखाड्याची दमदार कामगिरी.

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण प्रतिनिधी – संतोष साळुंके.

३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त स्वराज्य राजधानी रायगड येथे मांडवगण फराटा येथील राजमाता जिजाऊ शिवकालीन मर्दानी आखाड्याने शिवकालीन युद्धकलेचे अत्यंत प्रभावी व ऐतिहासिक कौशल्यपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.


शौर्य हे रक्तातच असावे लागते .

या वाक्याप्रमाने सादरीकरणातील सर्वात विशेष आकर्षण ठरली कावेरी चेतन शितोळे ही अवघ्या तीन वर्षांची चिमुकली. मुसळधार पाऊस, चिखल आणि कठीण परिस्थितीची पर्वा न करता तिने लाठी-काठी, तलवार यांसारख्या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक अत्यंत आत्मविश्वासाने सादर केले. तिच्या या धाडसाचे आणि कौशल्याचे विविध स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.

Screenshot

याशिवाय आखाड्यातील मुली वैजंती गवळी, वैष्णवी काळे ,आर्या कुतवळ, आर्या मचाले, भुमिका थोरात ,साक्षी शिंदे , तनया फराटे , यांनी दांडपट्टा, लाठी-काठी, काठीयुद्ध, तलवार, तलवारयुद्ध, उरुमी तलवार, भालाफेक अशा विविध शिवकालीन युद्धकलांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करून स्वराज्याच्या शौर्यपरंपरेची झलक उपस्थितांना अनुभवायला दिली.
या आखाड्याचे नेतृत्व NCC राष्ट्रीय खेळाडू सौ.धनश्री चेतन शितोळे यांनी केले असून त्या विद्यार्थ्यांना शिवकालीन मर्दानी खेळांचे नियमित प्रशिक्षण देतात. या आखाड्याच्या माध्यमातून केवळ युद्धकलेचे प्रशिक्षणच नव्हे, तर मुलांमध्ये धाडस, शिस्त, स्वावलंबन आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्याचे कार्यही सातत्याने केले जात आहे.


विशेष म्हणजे मांडवगण फराटा येथून प्रथमच मर्दानी आखाड्याने रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभाग नोंदवला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आखाड्याला रायगडावरील मानाची चांदीची शिवमुद्रा, मानाची साडी, ट्रॉफी आणि सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

ही ऐतिहासिक कामगिरी मांडवगण फराटा गावासाठी अभिमानाची बाब ठरली असून शिवकालीन मर्दानी खेळांची परंपरा जतन करण्यासाठी हा आखाडा महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
यामुळे सर्व सामाजिक स्तरातून या मर्दानी आखाड्याचे कौतुक होत आहे.
🚩जय भवानी, जय शिवराय!

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 1 4 2 0
Users Today : 5
Users Yesterday : 143