वरूडे येथील खून प्रकरण ३६ तासांत उघड; अल्पवयीन ताब्यात

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे): शिरूर तालुक्यातील वरूडे येथील रानमळा परिसरात घराबाहेर झोपलेल्या बाळासो बबन तांबे (वय ४३) यांचा ८ जून रोजी पहाटे धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्रापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान मयताच्या पूर्वीच्या वादांची माहिती घेतली असता गावातील एका अल्पवयीन मुलावर संशय निर्माण झाला. पोलिसांनी त्याची पालकांच्या उपस्थितीत चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.

पोलिस तपासात दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादाचा तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवीगाळ व धमकीचा राग मनात धरून संबंधित अल्पवयीन मुलाने लोखंडी कोयत्याने वार करून बाळासो तांबे यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून खुनासाठी वापरण्यात आलेला लोखंडी कोयता जप्त केला आहे.

Screenshot

या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या ३६ तासांत करण्यात पोलिसांना यश आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे व सुजित जगताप करीत आहेत.

या कारवाईसाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने विशेष कामगिरी बजावली.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 5 7 1 3
Users Today : 114
Users Yesterday : 26