Breaking News
शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २४ लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरणारा नोकर नांदेडमधून जेरबंद रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेची 2026-2027 कार्यकारणी जाहीर तुकाराम मुंढेंचा धडाका; पदभार स्वीकारताच राज्यभर धडक कारवायांची मालिका! शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मोठा तांत्रिक घोळ; ७८ ग्रामपंचायतींचे ७२९ सदस्य मतदानापासून वंचित? शिरूर शहरात बकरी ईद साठी आणलेला बोकड गेला चोरीला चार जणांविरोधात गुन्हा दाखल! पुणे ते शिरूर अवघ्या 45 मिनिटांत; देशातील सर्वांत मोठ्या उन्नत महामार्ग प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन; चार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २४ लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरणारा नोकर नांदेडमधून जेरबंद

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर
शिरूर शहरातील आनंद सोसायटी परिसरातील घरातून तब्बल २४ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व चांदीच्या वस्तू चोरी करणाऱ्या नोकराला शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने नांदेड जिल्ह्यातून अटक करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याप्रकरणी शिरूर येथील आनंद सोसायटीतील रहिवासी नितीन मोतीलाल मुथ्था यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या घरात काम करणारे विलास आनंदा खोसडे व सारजा विलास खोसडे (रा. भायेगाव, जि. नांदेड) यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची भांडी व इतर मौल्यवान साहित्य चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. त्यानुसार शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करताना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी विलास आनंदा खोसडे हा जांब (ता. मुखेड, जि. नांदेड) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

Screenshot

या कारवाईदरम्यान पोलिसांनी चोरीस गेलेला सुमारे २४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये ७ किलो १३४ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू व दागिने तसेच ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.


ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने केली.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 7 3 2 2
Users Today : 102
Users Yesterday : 108