शिरूर | प्रतिनिधी: सुदर्शन दरेकर
नसरापूर येथे घडलेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात शिरूर शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज शिरूर येथे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात संबंधित नराधम आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच फास्टट्रॅक कोर्टामध्ये तातडीने सुनावणी करून आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण समाजमन संतप्त झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक रवी उर्फ शाम मनोहर ढोबळे, आयेशा सय्यद, संगीता मल्लाव,सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे, उषा वाखारे डॉ. संतोष पोटे यांच्यासह “आम्ही शिरूरकर” फाउंडेशनचे रवी बापू सानप, योगेश जामदार, प्रिया बिरादार, शोभना पाचंगे,गीता आढाव, सविता बोरुडे, शशिकला काळे,रिता जाधव, अश्विनी नरके, अरुणा चव्हाण, ज्योती गायकवाड, यशराज नरवडे, नेहा नखडे, मायाताई जाधव, श्रुतिका झांबरे,दिपाली जाधव,कल्पना पुंडे आदी उपस्थित होते.

तसेच पत्रकार मुकुंद ढोबळे, संतोष शिंदे, अर्जुन बढे, अरुणकुमार मोटे यांच्यासह अनेक नागरिकांनी या निषेधात सहभाग घेतला.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून समाजात अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, शहरात कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्यास अशा घटनांना आळा घालणे शक्य होईल.
यावेळी उपस्थितांनी आरोपीस कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा देण्याची मागणी करत महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.





Users Today : 417
Users Yesterday : 20