Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

स्पीड ब्रेकर — वरदान की शाप…?

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधि:- दत्तात्रय हिरामण कर्डिले

सरदवाडी चे स्पीड ब्रेकर ठरत आहे अपघातच कारण.काल रात्री पुन्हा एकदा स्पीड ब्रेकर वर वाहनाचा ताबा सुटुन गाड़ी रस्त्या लगत च्या हॉटेल वर जाऊन आदळली.रात्रिची वेळ असल्या कारणामुळे सुदैवाने जीवितहानि झाली नाही.असे अपघात सरदवाडी या ठिकाणी वारंवार झाले आहेत.


या स्पीड ब्रेकर जवळ मोठी राहदारी आहे.लहान लहान मुले,वयस्कर लोक यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.या स्पीड ब्रेकर च्या खालच्या बाजूने जास्त मोकळी जागा असल्या कारणाने गाड्या खुप स्पीड ने त्या मोकळ्या जागेतून जात राहतात.

Screenshot

मग त्या स्पीड ब्रेकर चा उपयोग काय?

रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर हे अपघात टाळण्यासाठी आणि वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक असले, रंगसंगतीचा अभाव आणि सूचना फलक नसल्यामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात. यामुळे अपघात, वाहनांचे नुकसान आणि प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होतो. विशेषतः दुचाकीस्वार, वृद्ध व्यक्ती आणि रुग्णवाहिका यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा या स्पीड ब्रेकरमुळे वाहतूक कोंडीही वाढते. त्यामुळे प्रशासनाने नियमानुसार, स्पष्ट चिन्हांसह आणि योग्य ठिकाणीच स्पीड ब्रेकर उभारणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या दैनंदिन प्रवासातील त्रास कमी करणे ही देखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे.स्पीड ब्रेकर ची 2 ते 3 वेळा बातमी न्यूज़ ला येऊन सुद्धा त्यावर काही उपाय योजना नाहीत.


स्पीड ब्रेकरवरून जाणाऱ्या वाहनांचा कर्कश हॉर्न, ब्रेकचा आवाज आणि सततची वाहतूक यामुळे परिसरातील वृद्ध पुरुषांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. शांततेची गरज असलेल्या वयात हा आवाज त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतो. रक्तदाब वाढणे, डोकेदुखी, चिडचिड, झोपेचा अभाव आणि मानसिक तणाव अशा समस्या निर्माण होतात.

 

या स्पीड ब्रेकर वर जर दुर्दैवाने जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण…..?
असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे……

क्रमशा..

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21