शिरूरमध्ये गावागावांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय; पोलीस पाटलांच्या बैठकीत निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:सुदर्शन दरेकर
शिरूर पोलीस स्टेशन येथे आज दि. 27 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान सर्व पोलीस पाटील यांना गावांच्या सुरक्षेसाठी जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हे कॅमेरे लोकसहभागातून तसेच ग्रामपंचायतीच्या मदतीने उभारण्यावर विशेष भर देण्यात आला.


यावेळी शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांच्याशी समक्ष संवाद साधण्यात आला. त्यांनी गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात येईल, तसेच या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही त्वरित केली जाईल, असे आश्वासन दिले.

प्रस्तावित कारवाई:

Screenshot

पंचायत समितीमार्फत गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार
ग्रामपंचायत व नागरिकांच्या सहकार्याने अधिकाधिक कॅमेरे बसवण्यावर भर
या बैठकीमुळे गावागावांत सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या कामाला गती मिळणार असून, त्यामुळे ग्रामीण भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 3 2 5 2
Users Today : 122
Users Yesterday : 60