Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रवाहात आणणे हेच मुक्त विद्यापीठाचे मोठे सामाजिक काम : डॉ.भाऊसाहेब जाधव

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:सुदर्शन दरेकर
शिक्षणापासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे हेच मुक्त विद्यापीठाचे मोठे सामाजिक कार्य होय. असे प्रतिपादन मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.भाऊसाहेब जाधव यांनी केले. शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राच्या वतीने एम.ए.व एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या संशोधन प्रकल्प व अहवाल लेखन मार्गदर्शन कार्यशाळेच्या उदघाट्न समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य नंदकुमार निकम हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर विभागीय संचालक डॉ.व्ही.बी.गायकवाड, प्राचार्य डॉ.के.सी .मोहिते, उपप्राचार्य पार.एच.एस.जाधव यांची उपस्थिती होती.

आपल्या भाषणात डॉ. भाऊसाहेब जाधव यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र् मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थी, स्त्रीया , शेतकरी, कामगार इत्यादी घटकांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना जीवन व्यवहार व कौशल्यावर आधारित शिक्षणाची संधी उपल्बध करुन देणे हीच मुक्त विद्यापीठाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. सी.टी. बोरा महाविद्यालय व महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरी भागाच्या तुलनेत दर्जेदार व गुणवत्ताप्रधान शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असून या महाविद्यालयाने अतिशय चांगले संस्कार व उत्तम शैक्षणिक प्रथा-परंपरा जपल्याचे प्रतिपादन केले.

Screenshot

पुढे बोलताना डॉ.जाधव यांनी मुक्त विद्यापीठाने एम.बी.ए चा शिक्षणक्रम सुरु करुन ग्रामीण व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षणाची संधी दिली असून मोठ्या संस्थांप्रमाणे केवळ पॅकेज मिळविणे नव्हे तर ज्ञान मिळविणे हा या अभ्यासक्रमाचा हेतू असल्याचे मत व्यक्त केले. शैक्षणिक प्रक्रियेत पुस्तकातील सैद्धांतिक ज्ञानाला व्यावहारिक व प्रात्यक्षिक ज्ञानाची जोड दिल्यशिवाय समाजातील सद्यस्थितीत प्रश्न समजणार नाहीत त्यामुळेच उच्च शिक्षणात समाजाभिमुख संशोधनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. यासाठीच अशा उपक्रमांची गरज असून मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्राने अशी संशोधन कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले.
शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले यांच्या पुढाकारातून मुक्त विद्यापीठाची स्थापना झाल्याचे सांगून विद्यापीठाच्या ज्ञानगंगा घरोघरी या ब्रीद वाक्यातूनच विद्यापीठाचे ध्येय स्पष्ट होते असे मत व्यक्त केले.

मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याची गुणवत्ता विद्यापीठाचा अभ्यासक्रम, समंत्रण सत्रे ,व अध्ययन साहित्य यातून अधोरेखित झाली आहे. काळाच्या व समाजाच्या गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार समंत्रण सत्रांचे आयोजन सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार अध्ययन साहित्य किंवा पुस्तके पुरविणारे मुक्त विद्यापीठ एकमेव पहिले विद्यापीठ असल्याचे महत्वाचे प्रतिपादन केले. विद्यापीठाच्या ब्रीद वाक्यानुसार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या लाखो विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्याचे मुक्त विद्यापीठाचे कार्य महत्वाचे असल्याचे सांगून सी.टी. बोरा महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्राने १९९२ पासून गावोगावी व घरोघरी प्रचार-प्रसार करुन शिरुर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य आधारित व्यवसायिक व पारंपरिक अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविले. या शैक्षणिक कार्यातून परिसरातील जवळपास २०० गावांतील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, शिक्षक, औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी यांच्या जडणघडणीत सी.टी.बोरा महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्राचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन केले.


याप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राचे संचालक डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संशोधनास फार महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे असा सल्ला दिला. याशिवाय क्षेत्रीय व संशोधन प्रकल्प याबाबतीतील संशोधनाचे टप्पे व अहवाल लेखनाची प्रक्रिया स्पष्ट करुन पदव्युत्तर शिक्षणक्रम व संशोधन यासंबंधीची मुक्त विद्यापीठाची भूमिकाही मांडली .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात केंद्र संयोजक डॉ.अंबादास केत यांनी कार्यशाळेची भूमिका व रुपरेषा स्पष्ट केली. आपल्या स्वागतपर मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य तथा अभ्यासकेंद्राचे प्रमुख डॉ.के.सी. मोहिते यांनी मान्यवरांचे स्वागत करुन सी.टी. बोरा महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांचा व एकूण शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. याशिवाय नाविन्यपूर्ण शोध, समाज व राष्ट्राच्या गरजा व समस्यांवर आधारित संशोधन संशोधन हेच उच्च शिक्षणाचे ध्येय असून विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक संशोधक वृत्ती जोपासून शैक्षणिक गुणवत्ता टिकविण्याचा प्रयत्न करावा तसेच सातत्याने नवीन शिकण्याची धडपड करावी असे आव्हान केले. अभ्यास केंद्राचे मार्गदर्शक प्रा.चंद्रकांत धापटे यांनी उदघाटन कार्यक्रमाचे आभार मानले. प्रा.सतीश धुमाळ यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला तर डॉ.क्रांती पैठणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ.भाऊसाहेब जाधव यांची मराठवाडा मित्र मंडळ या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी संशोधन क्षेत्रातील तज्ञ् मान्यवरांचीमार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. त्या अंतर्गत डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व संशोधन प्रकल्प ” या विषयावर मार्गदर्शन केले. अहिल्यानगर येथील डॉ.राजेंद्रसिंग परदेशी यांनी एम.बी.ए च्या विद्यार्थ्यांना “व्यवस्थापन शास्त्रातील संशोधन व अहवाल लेखन ” या विषयावर तर डॉ.पद्माकर प्रभुणे, शिरुर यांनी “भाषा व सामाजिक शास्त्रातील संशोधन ” या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ.के.सी. मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोप समारंभात विद्यार्थ्यांनी मनोगते व विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यशाळेत अभ्यास केंद्रावरील एम.ए व एम.बी.ए चे १२० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते

कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ.सुरज सावंत, डॉ.अशोक चौधरी, डॉ.सुरेश शिंदे, प्रा.आरती अनाप, प्रा.अरुण दिवटे, प्रा. विलास निचीत, प्रा.सुजाता हणमंते, प्रा.आप्पासाहेब चव्हाण, निळोबा भोगावडे यांनी परिश्रम

Screenshot

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 5
Users Today : 3
Users Yesterday : 21