मानाचा तुरा…..!

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी:- दत्तात्रय हिरामण कर्डिले

डॉ. संदीप किसनराव सरोदे सर यांना ‘डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार २०२६’ जाहीर

सरदवाडी येथील सामाजिक कार्य, शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून सातत्याने जनसेवा करणारे डॉ. संदीप किसनराव सरोदे सर यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान, उरुळी कांचन यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार २०२६ “जाहीर झाला आहे.

या सन्मानामुळे शिरूर तालुका तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.

पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई हे ग्रामीण विकास, शेती आणि समाजकारण या क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येतो. यावर्षी डॉ. संदीप सरोदे सर यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. सरोदे सर यांनी शिक्षण, समाजप्रबोधन, ,धार्मिक क्षेत्रात तसेच युवक मार्गदर्शन, तसेच ग्रामीण भागातील विविध सामाजिक उपक्रमांतून आपला ठसा उमटवला आहे. अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी गरजू घटकांना मदत केली असून, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येण्यास हातभार लागला आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सोमवार, दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुणे येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, भवानी पेठ येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र साठे, विकास वारके, डॉ. भावार्थ देखणे, डॉ. भगवतसिंग, जितेंद्र बछन, कृष्णा खंडसे ,एकनाथ घनवट सर,यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

तसेच खास उपस्थितीत साहित्य, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

Screenshot

या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे *अध्यक्ष ह.भ.प. डॉ. रविंद्र दि. भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून* अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणार आहे.

डॉ. संदीप सरोदे सर यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत*
एकूणच, समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची ही परंपरा असून, डॉ. संदीप सरोदे सर यांचा सन्मान हा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

 

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 1 9 6 0
Users Today : 13
Users Yesterday : 85