“कायदेविषयक मार्गदर्शन एक काळाची गरज…..!

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधि:- दत्तात्रय हिरामण कर्डिले

कारेगाव : आजच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर कायद्याची प्राथमिक माहितीही असणे गरजेचे आहे. याच उद्देशाने श्री डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालय, कारेगाव येथे 17 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांसाठी “कायदेविषयक मार्गदर्शन” या विषयावर एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात घोडनदी न्यायालयातील न्यायालयाचे न्यायाधीश एस.डी.वानखेडे साहेब, घोडनदी वकील संघटना अध्यक्ष उदय सरोदे सर, माजी अध्यक्ष वीरेंद्र सावंत, तसेच अ‍ॅड.वैशाली धोंगडे मॅडम, अ‍ॅड.ऋतुजा खोले मॅडम, अ‍ॅड.शालिनी शेळके मॅडम,
घोडनदी न्यायलयाचे अधिकारी Bondarde भाऊसाहेब, म्हस्के साहेब इ.मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विविध कायद्यांची माहिती सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत दिली.

विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्यांची जाणीव ठेवावी, सायबर गुन्हे, बालहक्क, तसेच दैनंदिन जीवनातील कायदेशीर बाबींबाबत सजग राहावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली.
शाळेचे शिक्षक व उपस्थित मान्यवर यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.विमल झावरे मॅडम,अनिल खंदारे सर,आकाश खेडकर सर,श्रीम.धनश्री कर्पे मॅडम,श्रीम.निकिता जाधव मॅडम,श्रीम.कविता धावड़े मॅडम आणि योगिता पवार मॅडम सर्व शिक्षक उपस्थित होते.


अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य निर्णयक्षमता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
खरच अश्या पद्धतीचे मार्गदर्शन मुलांना गुन्हेगार होण्यापासुन वाचवेल आणि अश्या पद्धतीचे योग्य मार्गदर्शन ही आज एक काळाची गरज आहे.

 

आज काल आपण समाजात पाहतो की बालगुन्हेगारी चे प्रमाण खुप वाढले आहे.जर पाहायला गेल तर बऱ्याच गंभीर गुन्ह्यांमध्ये बालकांचे प्रमाण जास्त आहे हे प्रमाण कमी करण्यासाठी अश्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.आणि असे कार्यक्रम सर्व शाळांमधे होणे गरजेचे आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 1 9 6 0
Users Today : 13
Users Yesterday : 85