Breaking News
परमात्मा शिव नेहमीच आपल्या बरोबर राहतो नेहमीच आपल्या सुखदुःखात तो आपल्याला मदत करतो त्यासाठी त्याची कायम नामस्मरण करा – पंडित प्रदीपजी मिश्रा श्री शिव महापुराण कथा दिनांक 2 मार्च रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे दुःख आणि सुख हे आपले सदस्य आहेत: आचार्य प.पू.प्रदीपजी मिश्रा शाळा व्यवस्थापन समितीची नवी कार्यकारिणी जाहीर संतप्त ग्रामस्थांकडून निकृष्ट दर्जाचे काम बंद करण्यात आले… प्रशासनाकडून उत्कृष्ट काम करण्याचे आदेश… झिब्राच्या कथा पुस्तकाला चौथा पुरस्कार जाहीर -मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरकडून होणार गौरव सलग आठ वर्ष शिवजयंती साजरी करत एक वेगळा आदर्श….

परमात्मा शिव नेहमीच आपल्या बरोबर राहतो नेहमीच आपल्या सुखदुःखात तो आपल्याला मदत करतो त्यासाठी त्याची कायम नामस्मरण करा – पंडित प्रदीपजी मिश्रा श्री शिव महापुराण कथा दिनांक 2 मार्च रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर:प्रतिनिधी
आई वडील व ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या गरजू रुग्णांना आधार द्या ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गरज आहे अशा विद्यार्थ्यांना मदत करा असे करत असताना गरजूंची दुःख हलके केले तर भगवान शंकर आपल्याला नक्कीच प्रसन्न होतील असा मंत्र आचार्य प.पू .पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी देऊन पुणे जिल्हा ही साधू संतांची भूमी आहे संत ज्ञानेश्वरांची भूमी आहे असेही यावेळी सांगितले.

आज श्री शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी अक्षरशः भक्तीचा महापूर आल्याचे दिसून आले.

श्री शिव महापुराण कथा दिनांक 2 मार्च रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
शिरूर रामलिंग रोड येथे आचार्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून रंगणाऱ्या श्री शिवमहापुराण
कथेचा आज पाचवा दिवस होता. उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल त्याच्या पत्नी दिनाभाभी धारिवाल, चिरंजीव युवा उद्योजक आदित्य धारिवाल, कन्या साक्षी रोहित मेहता, जावई रोहित मेहता,भगिनी उज्वला लुंकड,सुरेखा चोपडा, कल्पना लुणावत, यांचे हस्ते आरती करण्यात आली.

 

यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त यांनी हजेरी लावल्याने परिसर फुलून गेला होता. तर सात दिवस चालणाऱ्या श्री शिव पुराण कार्यक्रमाचा शेवटचा दिवस सोमवार दिनांक 2 मार्च रोजी असून यावेळी सकाळी आठ वाजता श्री शिव महापुराण आता कार्यक्रम होणार असल्याचे आचार्य प्रदीप मिश्रा यांनी सांगितले.

आर्थिक उन्नतीसोबतच अध्यात्मिक उन्नती अत्यंत महत्त्वाची आहे. पैसे कमवा, पण त्याचबरोबर दुवा आणि आशीर्वादही कमवा. भुकेल्याला अन्न द्या, गरजूंच्या कामी या, अडचणीत असणाऱ्याला मदत करा – त्यातून मिळणारा आशीर्वाद महत्वाचा आहे.

महामृत्युंजय मंत्र काळाच्या भीतीपासून दूर करतो आणि प्रत्येक क्षणी शिवशंकरांचे स्मरण मनाला स्थैर्य देते, असेही त्यांनी स्पष्ट केले.तणावग्रस्त जीवनात शांतता, समाधान आणि सकारात्मकतेचा नवा किरण या सोहळ्याने भक्तांच्या मनात प्रज्वलित केला आहे.
“दुसऱ्याचे दुःख दूर करा – महादेव तुमच्यावर कृपा करतील,” या संदेशाने शिरूरकरांच्या हृदयात अध्यात्मिक जागृतीची ज्योत प्रज्वलित झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

अडचणीच्या काळात असो दुःखाच्या काळात असो कुठल्याही काळामध्ये देवाचे नाव घेतले तर देव नक्कीच आपल्या मदतीला धावून येत असतो ज्यावेळी द्रोपदीला भर सभेत अपमानित करत होते त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान यांचे नामस्मरण द्रौपदीने करतात भगवान लगेच द्रौपदीच्या मदतीला आले देवाची मनापासून भक्ती भजन कीर्तन केल्यास देव नक्कीच आपल्या मदतीला येतो देवाला माहिती हा माझा भक्त कसाही असो तो माझा भक्त आहे आणि त्याच्या अडचणीच्या काळात तो धावून येत असतो असेही आचार्य प्रदीप मिश्रा यांनी सांगून श्री शिव महापुराण कथेत रुदक्षाचे महत्त्व सांगितले आहे.

एक मुखी रुद्राक्ष पासून ते 14 मुखी रुद्राक्षाचे चे महत्व तर एक मुखी रुद्राक्ष पासून 21 मुखी रुद्राक्षाचे महत्त्व सांगून पाच मुखी रुद्राक्ष व सात मुखी रुद्राक्ष आपल्या स्वतःच्या शरीरात धारण केले तर एखादा मोठा रोग आपल्याला होणारा असेल तर तो तो रोग या रुद्राक्षामुळे दूर होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगून विविध रोगांवर रुद्राक्ष कसा उपयोगी आहे याबाबत लवकरच सिहोर येथे रुद्राक्ष रिसर्च सेंटरचे सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 8 5 0 2
Users Today : 2
Users Yesterday : 44