दुःख आणि सुख हे आपले सदस्य आहेत: आचार्य प.पू.प्रदीपजी मिश्रा

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील रामलिंग रोड येथे दि. २४ फेब्रुवारी पासून प.पू.प्रदीपजी मिश्रा (सिहोर वाले )यांच्या अमृत वाणीतून श्री.शिव महापुराण कथा सुरू असून,आज या कथेचा चौथा दिवस होता.

त्यांनी आज महादेवाची पूजा करण्यासाठी आपल्याला धन,फळ,फूल नसले तरी चालतील,महादेवाची पूजा करण्यासाठी मंदिर लहान असेल तरी चालेल पण मन मोठे असावे व आपला फक्त महादेवावर विश्वास असला तरी शिव आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात.हे अनेक उदाहरणे देऊन सोप्या शब्दात त्यांनी सांगितले .
आपण जर आपल्या पद्धतीने रोज शिवलिंग बनवून पूजा केली तर सती घृष्णेश्वर मातेला जसा अनुभव आला व तिच्या पूजेचे फळ तिला मिळाले तसे प्रत्येका ला मिळाल्याशिवाय राहणार नाही व ज्या प्रमाणे सत्यवती साठी स्वतः शिव त्यांच्या सासू चे रूप घेऊन तिच्या प्रसव वेदनेत धाऊन आले ,तसे आपल्या सर्वांच्या मदतीला कोणत्याही रूपात धावून येऊ शकतात,त्यासाठी फक्त आपला शिव वार विश्वास व रोज किव्हा निदान प्रदोष च्या दिवशी “एक लोटा जल, “ शिवच्या पिंडीवर अर्पण केले,तरी शिव प्रसन्न होतात व आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात.

शिव म्हणजेच आशितोष व त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एखाद्या उपाशी व तहान लागलेल्या जेवण व पाणी दिले तरी पुरे व भटक्या कुत्र्यांना व गायींना फक्त पिण्यासाठी पाणी ठेवले तरी आपल्या वर शिव ची कृपा होते,अशा प्रेमळ व सुमधुर शब्दात सांगून सर्व शिव भक्तांना सुख व दुःख आपले फक्त सदस्य आहेत व काहीच कायमस्वरूपी नसते म्हणून हसत रहा व शिव वार विश्वास ठेवा,आपले नाही आपल्या सर्व पिढ्यांचे दुःख दूर होईल.

मनुष्य कायम ताण-तणावा खाली वावरत असतो ,अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्ती पर्यंत सर्व जण अस्थिर जीवन,चंचल मन व तणावखाली दिसतो व हा तणाव दूर करण्यासाठी आपण सकाळी लवकर उठून लवकर अंघोळ करावी,असे आपल्या अमृत वाणीतून सांगत,त्यांनी शिव भक्ताना सत्संगात आले की सर्व शिव मय जीवन होते ,हे सांगितले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 8 4 6 0
Users Today : 4
Users Yesterday : 23