ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीनचे वितरण

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके
दिनांक : १५ फेब्रुवारी २०२६ रोजी
श्री बोरमलनाथ मंदीर केडगाव चौफुला ता दौंड येथे,
ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ,बोरमलनाथ मंदिर केडगांव चौफुला येथे शिलाई मशीन वितरण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

या उपक्रमांतर्गत गरजू व होतकरू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ कुमीता तवर ,सौ लताताई कुंभार , सौ रेखाताई ढमढेरे व सौ रुपाली शितोळे यांनी_ हर्षल फाउंडेशन देवळा या संस्थेच्या सहकार्यातून किरण एंटरप्रायजेस उदयोग समूह पाटस यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.

लाईफस्प्रिंग हेल्थकेअर या सस्थेच्या वतीने प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरंग गुरव (ईश्वरपूर सांगली ) उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी महिलांनी कौशल्याच्या बळावर स्वतःचा उद्योग उभारून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालावी, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे महिलांचे आरोग्य व मासिक पाळीत घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले

या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाभार्थी महिलांनी आयोजकांचे आभार मानून या संधीचा योग्य उपयोग करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमास स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत सदस्य व विविध मान्यवर उपस्थित होते.
त्याच प्रमाणे nexora कंपनीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करणार आहे.घरबसल्या कंपनीच्या माध्यमातून दहा हजार रुपये महिना कमावण्याची संधी उपलब्ध होणार आहे.यासाठी या कंपनीचे महाराष्ट्र समन्वयक श्री विनोद मोरे सर यांनी मार्गदर्शन केले.महिला संघटक रेखा डंबरे मॅडम. यांनी सांगितले जास्तीत जास्त महिलांना या गोष्टीचा लाभ मिळावा या साठी मी प्रयत्नशील राहणार आहे .तसेच लता कुंभार यांनी सांगितले या कामातून महिलांच्या गुणांना वाव मिळणार असून स्वतःच्या पायावर उभे राहता येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, कुमीता तवर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ लताताई कुभांर यांनी मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 7 4 4
Users Today : 6
Users Yesterday : 16