Breaking News
शेती बांधामुळे होणारे तंटे, वाद टाळण्यासाठी मांडवगण फराटा तंटामुक्ती समिती चा अभिमानास्पद उपक्रम शिरूर तालुक्यातील अनेक मान्यवरांचा सत्कार समारंभ पंढरपूर येथे संपन्न….. मांडवगण मध्ये प्रा.संतोष परदेशी सर लिखित.यांच्या गावपण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा.दिमाखात प्रतिनिधी.संतोष साळुंके शिरूर नगरपरिषद अभय योजनेसाठी अखेरचा एक दिवस बाकी …… जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा…… विश्व हिंदू परिषद – बजरंग दल – दुर्गा वहिनी आयोजित श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा व भव्य शोभायात्रा 2026 उत्साहात संपन्न मांडवगण फराटा ग्रामपंचायतीत भाऊसाहेब कोळपे यांची उपसरपंचपदी निवड – ७ विरुद्ध ११ मतांनी विजय

बालकुमारतर्फे पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी:सागर पवार
नुकतेच सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे देण्यात येणार्‍या विविध बालवाड्:मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

बाल साहित्यातील मातृसंस्था म्हणून अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेची ओळख आहे. संस्थेतर्फे 2025 या वर्षात प्रकाशित झालेले बालकादंबरिका, बालकथा, किशोरकथा, शिशुकथा, एकांकिका, चरित्र, काव्य, बालनाट्य, विज्ञान साहित्य, ग्रंथसजावट, प्रकाशक, बालसाहित्य समीक्षा, स्वैर अनुवाद, ललित साहित्य, मुलांचे अप्रकाशित साहित्य, प्रथम प्रकाशन, बालदिवाळी अंक (3 कविता, 3 कथा) या व्यतिरिक्त बालसाहित्यावर विशेष संशोधन करणार्या लेखकास प्रोत्साहनपर अमरेंद्र गाडगीळ पुरस्कार देण्यात येणार आहे. वरील प्रकारचे साहित्य 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेले असावे.

 

रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लेखक तसेच प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतीसह लेखकाचा परिचय व छायाचित्र पाठवावे. ग्रंथ 31 मार्च पर्यंत 2026 पर्यंत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, 202 बालाजी कॉम्प्लेक्स, बालाजीनगर, धनकवडी, पुणे 411043 या पत्त्यावर पोहोचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनील कुलकर्णी व कार्यवाह प्रसाद भडसावळे यांनी केले आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 0 4 2 0
Users Today : 5
Users Yesterday : 117