शिरूर प्रतिनिधी:
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील भौतिकशास्त्र आणि बि.व्होक. (रिन्यूएबल एनर्जी ) विभागाने आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले. सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. के.सी. मोहिते तसेच शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी संजय देशपांडे हे होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक समन्वयक डॉ. बोबडे डी.एच. यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील कवडे यांनी केले आणि डॉ. सुभाष पांढरकर यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन भौतिकशास्त्र व बि. व्होक विभागातील सर्व प्राध्यापकांनी केले.या आकाशदर्शन कार्यक्रमांमध्ये शिरूर शहरातील ५ ते ६ शाळां मधील सुमारे ४५० ते ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

पुण्यातील नामांकित संस्था आयुका येथील तुषार पुरोहित, महारुद्र मते आणि रुपेश लबडे यांनी आकाश गंगा तसेच ग्रह व तारे या संदर्भात माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली.

त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणावर टेलिस्कोप द्वारे विविध ग्रह व तारे दाखवण्यात आले. सदरच्या आकाश निरीक्षणामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी आणि शिरूर मधील प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा आकाशदर्शनाचा आनंद घेतला.






Users Today : 157
Users Yesterday : 360