Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

बालाजी शाळेने फी न भरलेल्या मुलांचे दाखले न दिल्याने अनेक मुलांचे शैक्षणिक नुकसान… याबाबत,शिशुपाल फाऊंडेशनने केले आंदोलन…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर तालुक्यातील रामलिंग रोड येथे असलेल्या बालाजी शिक्षण संस्थेत आज संपूर्ण शिरूर तालुक्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.इग्रजी ,सेमि व मराठी माध्यम अशा तीन माध्यमात येथे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

फीच्या चढत्या क्रमाने पालक वैतागले:

लहान गटापासून तर दहावी पर्यंत शिक्षण येथे सुरू आहेत.लहान गटात प्रवेश घेताना फी कमी असल्यामुळे अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेण्यासाठी येतात ,पण जसजसे विद्यार्थी पुढील इयतेत जातात,तसतसे पालकांना फी भरणे शक्य होत नाही व एका वर्षाची फी थकीत झाली की,पुढील वर्षी दोन वर्षाची फी भरणे अशक्य होत जाते.
काही प्रमाणात फी देत जाऊन दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बालाजी शाळा दाखले देणे थांबवते व त्यामूळ दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे प्रवेश घेता येत नाही व त्यांचे शैक्षणिक नुकसान होते.

अशाच काही पालकांनी शिशुपाल फाऊंडेशन व सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांच्याशी संपर्क साधला ,त्यांनी शाळेत जाऊन शाळेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव अण्णा पवार यांना या संदर्भात जाऊन जाब विचारला आणि विनंती पूर्वक सर्व बाबी व शाळेची घटना सांगत,जवळजवळ सहा मुलांची फी माफ करून त्यांना दाखले मिळवून दिले.

बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिव अण्णा पवार यांनी सुद्धा सदर विषयांमध्ये गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ,यासाठी भारतीय बहुजन पालक संघाचे महाराष्ट्र राज्य संयोजक नाथाभाऊ पाचर्णे तसेच प्रवीण शिशुपाल फाउंडेशन चे पदाधिकारी व स्वतः प्रवीण शिशुपाल साहेब यांच्या विनंतीचा तात्काळ आदर करून सदर सर्व विद्यार्थ्यांची फी माफ करून दाखले व गुणपत्रक त्यांना दिलेले आहे.

तसेच समाजातील कोणत्या ही शाळेने,कुणाचे ही दाखले व गुणपत्रके अडवून ठेवलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी भारतीय बहुजन पालक संघ व प्रवीण शिशुपाल फाउंडेशन यांच्यावतीने आव्हान करण्यात येते की त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. दोन्ही संघटनांच्या वतीने योग्य पद्धतीने मदत केली जाते. तसेच शिरूर तालुक्यातील सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांना याद्वारे इशारा देण्यात येत आहे की कोणत्याही विद्यार्थ्यांची शिक्षणापासून तो वंचित राहिला नाही पाहिजे यासाठी कोणत्याही शाळेने अडवणूक जर केली तर संघटनेच्या वतीने त्यांचा कायदेशीर पद्धतीने योग्य आणि खरपूस समाचार घेतला जाईल याची नोंद घ्यावी

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 8
Users Today : 6
Users Yesterday : 21