Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

शिरूरमध्ये ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त भव्य उत्सव — हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर (प्रतिनिधी) :
भारतीय जनमानसात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे ‘वंदे मातरम’ हे अमर गीत रचणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या सृजनाला यंदा १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्य सरकारच्या वतीने तालुकास्तरीय विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, शिरूर तालुक्यातील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि संतोष गोसावी यांच्या तालुकास्तरीय शासकीय समितीने “वंदे मातरम – मातृभूमीला नमन” या भावनिक घोषवाक्याखाली भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाण म्हणून रयत शिक्षण संस्थेचे प्रांगण निवडण्यात आले होते. सकाळपासूनच शिरूर शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी हातात तिरंगा आणि घोषवाक्यांच्या फलकांसह उत्साहाने एकत्र जमले. “वंदे मातरम”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि वातावरण देशभक्तीने भारले.


या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य, कविता सादर करून जनमानसात मातृभूमीविषयी आदरभाव जागवला. शिक्षकवर्ग, पालक आणि नागरिकांनीही उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा आनंद घेतला.

तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की,
“वंदे मातरम हे केवळ गीत नाही, तर ते भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे. या गीताने स्वातंत्र्यलढ्यात असंख्य क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. आजच्या पिढीनेही या भावनेला आपल्या मनात जपले पाहिजे.

कार्यक्रमाचे संयोजन संतोष गोसावी यांनी केले, तर शैक्षणिक संस्थांनी उत्स्फूर्त सहकार्य दिले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21