Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

शिरूर नगर परिषद निवडणूक 2025 : लोकशाही क्रांती आघाडी पॅनल उभे करणार नाही — बैठकीत एकमताने निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर (प्रतिनिधी) :
शिरूर नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी लोकशाही क्रांती आघाडीच्या संस्थापक सदस्यांची व कार्यकारीणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीत आघाडीने कोणती भूमिका घ्यावी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत सर्व बाजूंचा विचार करून अखेर लोकशाही क्रांती आघाडीने शिरूर नगर परिषद निवडणूक 2025 साठी आपले स्वतंत्र पॅनल उभे न करण्याचा निर्णय एकमताने मंजूर केला आहे.

बैठकीला संस्थापक सदस्य व ज्येष्ठ कार्यकर्ते रविंद्र कृपावती, रामचंद्र धनक, अँड. ओमप्रकाश सतेजा, किसनराव जाधव, माजी नगरसेवक मंगेश खंडरे, मोहम्मद हुसेन पटेल, अँड. सतीश गवारी, संजय बंडे आणि अँड. विक्रम पाटील उपस्थित होते.

गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये लोकशाही क्रांती आघाडीने शिरूर शहरात आपले पॅनल उभे करून सक्रिय सहभाग घेतला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत स्थानिक राजकीय समीकरणे, आघाडीतील संघटनात्मक घडामोडी आणि निवडणुकीतील एकूण वातावरण पाहता स्वतंत्र पॅनल न उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, लोकशाही क्रांती आघाडी व शिरूर शहर विकास आघाडी यांच्यात मनोमिलन होण्याची शक्यता स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे. या दोन आघाड्यांमध्ये झालेल्या गुप्त चर्चांना आता वेग आला असल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे.

आगामी काही दिवसांत या संभाव्य मनोमिलनाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिरूर नगर परिषद निवडणुकीच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21