Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

शिरूर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जनजागृती उपक्रम

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे)

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या वतीने शिरूर तालुक्यात “अँटी करप्शन कायदा आणि जनजागृती” या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जागरूकता निर्माण करणे हा होता.

 

यावेळी अधिकाऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी मार्गदर्शन पर नागरिकांना सांगण्यात आले की, कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी जर कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम एजंट यांनी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केली, तर अशा प्रकरणांची तात्काळ माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे द्यावी.

विभागाच्या अधिकृत संपर्क क्रमांकावर अशा तक्रारी नोंदविता येतात, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुहास हटेकर यांनी केले.

 

या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शहराध्यक्ष दिनकर साबळे, पर्वतराज नाबगे, अशोक मोरे, सुनील कदम आणि राहुल दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात शिरूर तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांविषयी नागरिकांच्या तक्रारींवरही चर्चा झाली.

त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय, भूमिअभिलेख, पोलीस स्टेशन, महावितरण आणि नगरपरिषद कार्यालयांना भेट देऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जनजागृती पत्रकांचे वितरण केले आणि कार्यालयांच्या दर्शनी भागात ती पत्रके लावण्यात आली.या उपक्रमामुळे शिरूर तालुक्यात भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांमध्ये जागरूकतेची भावना निर्माण झाली असून, विभागाच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 5
Users Today : 3
Users Yesterday : 21