शिरूर प्रतिनिधी:
दि .३०/०९/२०२५ रोजी जय माता दी मित्र मंडळ, इंदिरानगर शिरुर यांच्या वतीने शिरूर नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये कर्मचाऱ्यांना पारंपरिक पैठणी साडी व देवीचा फोटो देऊन सन्मानित करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश समाजासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करणे हा होता. त्यांच्या कष्टाला दाद देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम हाती घेतला.
उपस्थित मान्यवर:
या वेळी उपस्थित मंडळाचे अध्यक्ष चेतन भाऊ साठे ,संस्थापक अध्यक्ष दिपक भाऊ गव्हाणे ,ओम अडागळे, सोमनाथ ससाणे,सागर पंडित, प्रवीण झुंजुर्के, विशाल साबळे, गणेश गोरखे, सिद्धांत घाडगे, सुमित बागवे, महेश महाजन, सनी आगवान, रुपेश गुंजाळ, यश तांबे, पप्पू रणसिंग, बाळा गुंजाळ, कुणाल जगधने, श्रेयस गव्हाणे, साहिल कोकरे, सोनू कहार, निखिल जगधने, बबलू विधाटे, विनोद घाडगे, भाऊसाहेब पवार, विशाल मोरे, युवा नेते पप्पूभाऊ साठे, सामाजिक कार्यकर्ते -दादाभाऊ लोखंडेतसेच नगर परिषदेचे अधिकारी व इंदिरा नगर मधील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त केले व अपला असा सत्कार होणे ,ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे,आम्ही सर्व आपले कार्य पुढेही तत्परतेने करत राहण्याची ग्वाही त्यांनी यावेळस दिली.
जय माता दी मित्र मंडळ प्रत्येक वर्षी काही ना काही सामाजिक कार्य करत असते.
या सामाजिक उपक्रमाबद्दल परिसरातून जय माता दी मित्र मंडळाचे विशेष कौतुक होत आहे.
