शिरूर प्रतिनिधी:
२५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक फार्मसिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो.
याच दिवसाचे अवचित्य साधत श्री. छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म व बी. फार्म) व केमिस्ट असोसिएशन ऑफ शिरूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
अनेक मान्यवर :
या कार्यक्रमासाठी शिरूर शहरातील माजी कार्यकारणी सदस्य बाबाजी गलांडे, शिरूर तालुका केमिस्ट असोसिएशन सचिव सचिन गाडे, उमेश छाजेड, दीपक तातेड, मल्हारी वाळूज, प्रणव वाघ, बालाजी पवार, अतुल शेवाळे, दादासाहेब मांगडे, हनुमंत गाडे, विशाल ढवळे, अमित गावडे, अजय फलके, प्रवीण कोरेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वतीने डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. अमोल शहा सर व बी फार्मसीचे प्राचार्य डॉ. सचिन कोठावदे सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना बाबाजी गलांडे यांनी फार्मासिस्ट हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा असून समाजाला
निरोगी ठेवण्यासाठी ते आपले मोलाचे योगदान देत असतात हे नमूद केले. सचिन गाडे यांनी मेडिकल व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. मल्हारी वाळुंज यांनी मार्केटिंग क्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या संधींचा फायदा कसा करून घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले तर प्रणव वाघ यांनी विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करून स्वतःला कायम अपडेट कसे ठेवावे याबद्दल मार्गदर्शन केले डॉ. अमोल शहा सर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांनी सक्षम फार्मासिस्ट होण्यासाठी काय करावे याबद्दल ही मार्गदर्शन केले .
डॉ. सचिन कोठावदे सर यांनी एआय तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे कसा वापर करावा व स्वतःला कसे अपडेट ठेवावे याबद्दल मार्गदर्शन केले.
दिपक तातेड यांना पुरस्कार:
महाविद्यालयाच्या वतीने दीपक तातेड यांचा सिनीयर फार्मासिस्ट म्हणून सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे आभार मानले तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत शिरूर शहरांमधून रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये फार्मासिस्टची भूमिका तसेच त्यांचे महत्त्व पटवून देणारे पथनाट्य सादर केले.
तर बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी फार्मसी या अभ्यासक्रमाचे महत्त्व व फार्मासिस्टची समाजातील भूमिका या विषयावर शिरूर बस स्थानक व पाच कंदील चौक या परिसरात पथनाट्य सादर करण्यात आले.
दुपारच्या सत्रामध्ये श्री मनोज कुमार अय्या, औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन पुणे विभाग यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले यावेळी बोलताना त्यांनी प्रशासनातील करिअरच्या विविध संधी, तसेच फार्मासिस्ट हा फक्त औषध विक्रेता नसून रुग्ण समुपदेशक, औषधांमधील परस्पर संबंध, संशोधन गुणवत्ता विकास, औषध निर्मिती यासारख्या क्षेत्रात देखील मोलाचे योगदान देत असल्याचे नमूद केले.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना केमिस्ट असोसिएशन ऑफ शिरूर तालुका यांच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला.
