पुणे प्रतिनिधी:
महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणच्या नुकत्याच झालेल्या सभेत अध्यक्षपदी मयूर खंडेराव करंजे व कार्याध्यक्षपदी सचिन शिवाजीराव बेंडभर यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले.
कार्यकारणी जाहीर:
शिरूर तालुक्यात गेल्या दहा वर्षापासून कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणचे मावळते अध्यक्ष मनोहर परदेशी व कार्याध्यक्ष कुंडलिक कदम यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला. ती रिक्त पदे भरण्यासाठी वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात मयूर खंडेराव करंजे यांची अध्यक्षपदी तर सचिन शिवाजीराव बेंडभर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
याशिवाय मुख्य कार्यवाह पदी संभाजी गोरडे, सहकार्यवाह शेखर फराटे, उपाध्यक्ष संभाजी चौधरी, आकाश भोरडे, संजीव मांढरे, कोषाध्यक्ष राहुल चातुर, सहकोषाध्यक्ष प्रा. कुंडलिक कदम तर प्रमुख सल्लागार म्हणून मनोहर परदेशी, शंकर नऱ्हे आणि भरत दौंडकर यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र साहित्य परिषदे ची अनेक कामे:
महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणने आजपर्यंत गेल्या दहा वर्षात शिवार साहित्य संमेलन, निमंत्रितांचे कवी संमेलन, राज्यस्तरीय पुस्तक पुरस्कार सोहळा , उत्कृष्ट साहित्यिक व शिक्षक सन्मान, एक दिवसीय साहित्य संमेलन, शिरूर तालुक्यातील बालसाहित्यिकांसाठी काव्यलेखन स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच उत्कृष्ट वाचकांचा सन्मान अशा प्रकारचे परिसरात विविध कार्यक्रम घेतलेले आहेत. भविष्यातही महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण कडून साहित्यविषयक कार्यक्रम घेण्यात येतील व नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिली जाईल, असे मत नवनिर्वाचित अध्यक्ष मयूर करंजे व कार्याध्यक्ष सचिन बेंडभर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर परदेशी, स्वागत विठ्ठल वळसे पाटील तर आभार संजीव मांढरे यांनी मानले.
