शिरूर तालुका आघाडी जैन प्रकोष्ट पदी नितीन भंडारी

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या पूर्व मंडलच्या मुख्य कार्यकारिणी व आघाडी मोर्च्या च्या नवनिर्वाचित सदस्यांचा नियुक्तीची पत्रे नुकतेच भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा कंद यांच्या हस्ते देण्यात आली.

यावेळी शिरूर तालुक्यातील नामांकित व्यापारी नितीन प्रवीण भंडारी,यांना शिरूर तालुका आघाडी जैन प्रकोष्ट अध्यक्ष म्हणून प्रदीप कंद यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले व कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले व सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. पक्षाच्या विविध योजना, ध्येय धोरणे, कार्यक्रम आदी तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत व्हावे यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद व तालुका अध्यक्ष राहुलदादा पाचर्णे यांनी यावेळी केले.

या वेळी किमान वेतन सल्लागार मंडळ अध्यक्ष पदी गणेशराव ताठे व संचालक पदी बाबासाहेब दरेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान केला.

यावेळी मालतीताई पाचर्णे भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेते शिवाजीराव भुजबळ, धर्मेंद्रभाऊ खांडरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस भगवानराव शेळके ,पंचायत समिती सदस्य आबा सरोदे ,मा अध्यक्ष रामचंद्र निंबाळकर,नवनाथ दादा शितोळे,हनुमंतराव लांडगे किसान मोर्चा प्रदेश सुभाषराव कांडगे ,जिल्हा किसान मोर्चा सचिनराव मचाले,मा संचालक घोडगंगा कैलास पाटील सोनवणे,कामगार मोर्चा प महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप हिंगे, मा युवा मोर्चा अध्यक्ष रोहित खैरे, नगरसेवक विनोद भालेराव ,नगरसेवक संदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुक्यातील व शहरातील सर्व जैन बांधव व नागरिकांनी नितीन भंडारी यांना शुभेच्छा देत पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी सूत्रसंचालन व प्रास्ताविक युवा मोर्चा तालुका अध्यक्ष एकनाथ शेलार यांनी केले व आभार मा सरचिटणीस माऊली बहिरट यांनी मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 5 5 3 0 3
Users Today : 11
Users Yesterday : 22