वाघोली प्रतिनिधी:
वास्तविक पाहता श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवाच्या पूजेसाठी खास असतो.या दिवशी अनेक शिवभक्त पवित्र तीर्थक्षेत्रांतून कावडीने पाणी आणून शिवाचे जलाभिषेक करतात. ही परंपरा केवळ एक विधी नसून, ती आपल्या श्रद्धेची, एकतेची आणि निष्ठेची प्रतीक आहे.
अर्चना कटके व शांताराम कटके :
या मंगलमय पर्वाचे औचित्य साधूत शांताराम बापु कटके
शासन नियुक्त नगरसेवक पुणे महानगरपालिकातसेच मा.उपसरपंच, वाघोली व सौ.अर्चनाताई शांताराम बापू कटके मा जिल्हा परिषद सदस्य पुणे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनेव संपूर्ण वाघोली येथील ग्रामस्थ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महा कावड यात्रेचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.
श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कावड यात्रा:
भक्ती आणि श्रद्धेचा हा अभूतपूर्व संगम अनुभवण्यासाठी येत्या सोमवारी दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता सर्वानी उपस्थित रहावे,अशी विनंती अर्चनाताई कटके यांनी केली आहे.
या महाकावड यात्रेचा प्रवास:
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते वाघेश्वर मंदिर असा असणार आहे,महा कावड यात्रा ही आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या धार्मिक मूल्यांचा सन्मान करणारी आहे, आपण सर्वांनी या महायात्रेत सहभागी होऊन आपण ,आपली श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करू व या भव्य सोहळ्यात सहभागी होऊन आपण सर्वजण महादेवशंकराचा आशीर्वाद घेऊ यात अशी माहिती अर्चनाताई कटके यांनी पुणे ग्रामीण न्यूज शी बोलताना दिली व सर्वांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे विनंती ही केली आहे.
