शिरूर प्रतिनिधी:
शिरूर मधील कुंभार आळी, ढोर आळी, मुंबई बाजार या ठिकाणावरून अनेक छोटे रस्ते दशक्रिया विधी घाटाकडे जातात. शिरूर -श्रीगोंदा व पारनेर आशा अनेक तालुक्यातील नागरिक दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी येत असतात.
यावेळी त्यांना घाटाकडे जाणारा रस्ता लक्षात येत नाही,ही अडचण लक्षात घेऊन शिरूर मधील कुंभार समाजाचे तालुका अध्यक्ष योगेश सुदामराव जामदार यांनी आपल्या, वाढदिवसाचे औचित्य साधत या परिसरात दिशा दाखवणारे लोखंडी पाट्या लावून,एक वेगळा उपक्रम राबवला आहे.
या पाट्याचा लोकार्पण सोहळा जगविख्यात उद्योगपती व सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते संपन्न झाला.या वेळी बोलताना ते म्हणाले “तरुणांनी योग्य वयात व्यवसायात उतरणे गरजेचे आहे व व्यवसायात प्रगती करत असताना आपले कुटुंब आर्थिक दृष्टीने सुरक्षित झाल्यानंतर सामाजिक ऋण फेडण्यासाठी सामाजिक कार्य देखील करणे गरजेचे आहे.
योगेश जामदार यांचा आदर्श तरुणांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे यांचे काम आहे.
या वेळी योगेश जामदार म्हणाले “तरुणांनी आपल्या भागात भेडसावणाऱ्या अडचणी आपल्या ऐपती प्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आम्ही सर्व मित्र परिवार,प्रत्येक वर्षी वाढदिवसाचा व्यर्थ खर्च टाळून वृक्षारोपण, वाचनालय, पाणपोई असे अनेक उपक्रम वर्षानुवर्षे राबावतो आहे. याचा उपयोग सर्व सामान्य नागरिकांना होतो याचा आनंद होतो.”
उपस्थीत मान्यवर:
कार्यक्रमाला नगरसेवक मुज्जफर कुरेशी, मा उपनगराध्यक्ष संतोष कडेकर, शशिकांत शिर्के, पत्रकार संतोष शिंदे, पत्रकार बबन वाघमारे, पत्रकार अर्जुन बढे,शिक्षण मंडळ सभापती तुकाराम खोले, लहुजी शक्ती सेना अध्यक्ष बंटी जोगदंड, शुभम गंगावणे, प्रशांत शिंदे, सागर नरवडे, सुशांत कुटे, विशाल जामदार, साहेबराव श्रीमंदीलकर सह कुंभार आळी मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वआभार:
कार्यक्रमाचे स्वागत विजय शिर्के यांनी केली, तर प्रस्थावना शंकर जामदार केली.या कार्यक्रमाचे आभार अक्षय शिर्के यांनी मानले.
