खडकवासला पुणे प्रतिनिधी :
जि.प. प्रा. शाळा ठाकरवाडी ता. हवेली येथील विद्यार्थ्यांना साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ, व अजिक्य मित्र मंडळ मॉडेल कॉलनी यांच्यातर्फे शाळेय साहित्याची शनिवारी भेट देण्यात आली. यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मनीषा बुंदे, शाळेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष कैलास पायगुडे, सुवर्णा पायगुडे, नंदा ठाकर आदी उपस्थित होते.
गणेश मंडळाचे कार्यकर्ते:
विद्यार्थ्यांनी मंडळाचे पदाधिकारी पियुष शहा, उमेश शेवते, गुंजन शेवते, प्रसाद भोयरेकर, अजिंक्य भुजबळ, सिद्धी शेवते, मनस्वी शेवते, संदीप ठाकूर, मीरा शहा यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर पियुष शहा व उमेश शेवते यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले.
उद्याचे भविष्य :
आज तुम्ही छोटे असला, तरी उद्या तुम्ही खूप मोठे आणि जबाबदार नागरिक असणार आहेत. एका अर्थाने तुम्ही उद्याचा भारत आहात. कितीही अडचणी आल्या तरी शिक्षण थांबवू नका. ज्यांना कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव असते तेच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असते, असेही त्यांनी सांगितले.
मंडळाकडून विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्शील, पाण्याची बॉटल, डबा, बॅग, खोडरबर, शॉपनर, पाऊच आदी साहित्य देण्यात आले. मनीषा बुंदे यांनी पाहुण्याचे स्वागत केले. कैलास पायगुडे यांनी आभार मानले.
