गोरक्षणासाठी लढणाऱ्या शिरूरच्या सुपुत्राचा सन्मान… शिरूर च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :
शिरूर शहरात नव्हे तर संपूर्ण शिरूर तालुक्यात सामाजिक, धार्मिक आणि गोरक्षण क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे बजरंग दलाचे प्रमुख कार्यकर्ते अजिंक्य तारु यांची महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती” अंतर्गत मानद प्राणी कल्याण अधिकारी या उच्च व आदरणीय पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे.

या निवडीमुळे संपूर्ण शिरूर शहर, तालुका व पुणे जिल्ह्यातून विविध सामाजिक संघटना, नागरिक, तरुण कार्यकर्ते आणि गोरक्षण प्रेमींनी त्यांचे भरभरून अभिनंदन केले आहे व पुढील वाट चालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

अजिंक्य तारू यांची ही नियुक्ती ,म्हणजे त्यांच्या अथक परिश्रम व दीर्घकाळाच्या प्रामाणिक कष्टाची शासनाकडून मिळालेली पोचपावती आहे.

मुक्या प्राण्याची सेवा हीच ईश्वर सेवा:

अजिंक्य तारु हे गेली अनेक वर्षे शिरूर शहर व संपूर्ण जिल्ह्यात गोहत्येच्या विरोधात व गोवंश रक्षणासाठी तसेच प्राण्यांच्या हक्कासाठी लढा देत आहेत.
त्यांनी अनेकवेळा स्थानिक पोलिस प्रशासन व आपल्या गोरक्षक साथी दारांबरोबर गोरक्षणाच्या बाबतीत अनेक कार्यवाही घडवून आणल्या आहेत.

तसेच गायींचे अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करणे, अपघातग्रस्त जनावरांना वाचवणे, त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देणे, अशा असंख्य घटना त्यांच्या कार्यकाळात घडल्या आहेत व अजून ही हे कार्य सातत्याने सुरू आहे.त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आज अनेक युवक गोरक्षण आणि प्राणीमित्र म्हणून पुढे येत आहेत.
प्रसार माध्यमांशी बोलताना अजिंक्य तारु म्हणाले की,माझ्या कामाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली, याचा मला अभिमान आहे,मी आज पर्यंत ज्या निष्ठेने गोरक्षणासाठी झटत होतो, त्या कार्याला आता एक अधिकृत ओळख मिळाली आहे. या पुढेही मी संपूर्ण ताकदीने प्राणी कल्याणासाठी, गोवंश संरक्षणासाठी आणि जनजागृतीसाठी कार्यरत राहीन. मला मिळालेले हे पद अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा देते.”
शिरूर शहर व पंचक्रोशीत असणाऱ्या विविध हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, धर्मप्रेमी मंडळी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी अजिंक्य तारु यांचा फेटा बांधून, पुष्पगुच्छ देऊन आणि सोशल मीडियावर पोस्ट करून अभिनंदन केले आहे .
शिरूर शहरात अशी नियुक्ती होणे ही स्थानिकांसाठी व शिरूर शहरासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले आहे.

निस्वार्थी कार्य:

नवीन जबाबदारीनंतर अजिंक्य तारु यांनी सांगितले की, ते शाळा-महाविद्यालयांमध्ये प्राणी कल्याण जनजागृती कार्यक्रम राबवणार आहेत. तसेच प्राण्यांवरील अत्याचाराविरोधात प्रभावी उपाययोजना, फिरती जनजागृती मोहिमा, तसेच आपत्तीच्या काळात प्राण्यांना मदत करण्यासाठी स्थानिक पातळीवर टीम तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.
शिरूरच्या भूमीतून घडलेले हे अजिंक्य यांचे निस्वार्थी कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 7 8 3 9
Users Today : 21
Users Yesterday : 115