कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे)
वाघोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्यासाठी ‘वाघोली विकास मंच’ या नव्या व्यासपीठाची स्थापना डॉ. पवन सोनवणे यांच्या पुढाकाराने करण्यात आली. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, मोठ्या उत्साहात आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या मंचाची घोषणा करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी:
वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ चंद्रकांत कोलते, आणि शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक गणेश सातव यांच्या हस्ते मंचाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वाघोली व परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
राजकारण हे फक्त माध्यम:बाकी…..
डॉ. पवन सोनवणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “वाघोलीच्या सर्वसामान्य जनतेच्या अडी-अडचणी सोडवणे आणि विकासाला गती देणे हेच ‘वाघोली विकास मंच’ चे उद्दिष्ट आहे. राजकारण हा केवळ माध्यम आहे – खरा हेतू हा सेवा आणि विकास आहे. मी स्वतः जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे.”
सर्वांनी एकत्र या:
डॉ. सोनवणे हे वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी चेहरा असून, त्यांनी समाजकार्य, आरोग्य शिबिरे व जनजागृतीच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मंचाच्या स्थापनेनंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला अधिकृत सुरुवात झाली असून, वाघोलीतील स्थानिक राजकारणात त्यांनी विकासाचे ठोस पाऊल टाकले आहे, असे म्हटले जात आहे.
कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार:
दरम्यान, ते निवडणूक लढवणार याचे संकेत स्पष्ट असले तरी, ते कोणत्या पक्षाकडून निवडणुकीत उतरणार याबाबत अजूनही त्यांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय रणनीतीकडे संपूर्ण वाघोलीचे लक्ष लागले आहे.
