Breaking News
ओन्ली वुमन्स जिम व श्री स्वामी समर्थ सेवा संस्था शिरूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहातसाजरा शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

“शिवमुद्रा पतसंस्थेच्या कार्यक्रमात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; सरपंच पंकज कारखिले यांच्या कार्याचे कौतुक – सुजय विखे पाटील

Facebook
Twitter
WhatsApp

राळेगण थेरपाळ (ता. पारनेर) : सुदर्शन दरेकर
शिवमुद्रा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, राळेगण थेरपाळ यांचा भव्य कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राजकीय, सहकारी, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी विविध वक्त्यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचे कौतुक करताना संस्थेचे चेअरमन पंकज कारखिले यांच्या कार्यशैलीचा विशेष गौरव केला.

कार्यक्रमास माजी खासदार सुजयदादा विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथदादा कोरडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे, दूध संघाचे अध्यक्ष दत्ता नाना पवार, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, माजी नगराध्यक्ष विजय औटी, सहायक निबंधक विकास जाधव, जिल्हा परिषद सदस्य सचिन वराळ, सुभाष दुधाडे, वसंत चेडे, उद्योजक सुरेश पठारे, भाऊसाहेब खिलारे, दीपक ठोंबरे, दादाभाऊ वारे, बाबाजी लंके, राजूशेठ औटी, सरपंच लहू भालेकर, नीलेश खोडदे, पै. युवराज पठारे, सरपंच बाळासाहेब रेपाळे, सुषमा रावडे (राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा), सोनाली सालके (भाजपा तालुका अध्यक्षा), डॉ. श्रीकांत पठारे (शिवसेना तालुका अध्यक्ष), राजेंद्र वाघमोडे, लाभेश औटी, अंकुश गुंजाळ, जनसमृद्धी पतसंस्थेचे चेअरमन बन्सी बढे, व्यवस्थापक राजेश गोपाळे, व्हा. चेअरमन शरद गोपाळे, पांडुरंग बढे, रोहिदास मेसे, असिफ इनामदार, विकास सेवा संस्थेचे चेअरमन दत्तात्रय कारखिले, माजी सरपंच पोपटशेट कारखिले, शिवा काका खिलारी, लोकनियुक्त सरपंच आदींसह गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी खासदार सुजयदादा विखे पाटील म्हणाले, “राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने राजकारण करावे, मात्र पतसंस्था चालवताना सर्वांनी जबाबदारीने आणि पारदर्शकतेने कार्य केले पाहिजे.” त्यांनी पंकज कारखिले यांच्या कामाचे कौतुक करत राळेगण थेरपाळच्या चेहरा मोहरामध्ये ते आमूलाग्र बदल घडवत असल्याचे सांगितले. “त्यांच्या बरोबर आम्ही सदैव आहोत” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी पतसंस्थेच्या भक्कम आर्थिक कामकाजाचे व पारदर्शक व्यवस्थापनाचे कौतुक केले. नव्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक सक्षमतेकडे नेणारे हे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे पार पडले असून, उपस्थित ग्रामस्थांनी याला भरभरून प्रतिसाद दिला.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 1 2 3
Users Today : 31
Users Yesterday : 21