दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली.

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी:सागर पवार
नगरचा सुपुत्र असलेला नेहाल एस. घोडके या तरुणाने दिग्दर्शित केलेल्या ” ब्लॉसमिंग आॉलमंड ” या मराठी चित्रपटाची निवड दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अधिकृतपणे करण्यात आली आहे.

या चित्रपटाचे लेखन नेहाल एस. घोडके यांनी केले आहे. कथा, पटकथा आणि संवादही त्यांनीच लिहिले, असुन अनंत काळे यांनी स्क्रीप्ट सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. चित्रपटाच्या सिने मॅटोग्राफिचे काम सचिन गायगोवे यांनी केले.

या चित्रपटात सिने अभिनेत्री मनिषा मोरे, पुरुषोत्तम उपाध्ये, एन. के. गर्जे, जानवी लटके, अंजली कोंडावार, रावसाहेब अलकुटे, आणि प्रणीत मेढे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सहयोगी दिग्दर्शक म्हणून अमोल सुरुणकर, तर सहाय्यक म्हणून मयुर आहेर, शुभ कराळे आणि रिझवान सय्यद यांनी योगदान दिले आहे.

प्रकाशयोजनेची जबाबदारी सचीन गायगोवे, दिनेश सुतार आणि रिझवान सय्यद यांनी सांभाळली आहे. पोशाख आणि मेकअप विभागात श्रेया गायकवाड, अपूर्वा काकडे आणि सोनिया लोटके यांचा सहभाग आहे. ध्वनी विभागात शुभम कराळे आणि दिनेश सुतार यांनी काम पाहिले. कास्टिंग मध्ये निवृत्ती गर्जे आणि पुरुषोत्तम उपाध्ये यांनी केले. कार्यकारी निर्माता अमोल सुरुणकर आणि नेहाल घोडके कार्यरत आहेत.

हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याने संपूर्ण टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा टप्पा त्यांच्या चित्रपट प्रवासातील मौलाचा ठरत आहे.
त्याबद्दल घोडके आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. मानवी नात्यातील भावभावनांचे पदर उलगडणाऱ्या या सिनेमाला भरघोस प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा घोडक अभिनेत्री मनिषा मोरे यांनी केली आहे…

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 7 8 3 9
Users Today : 21
Users Yesterday : 115