Breaking News
ओन्ली वुमन्स जिम व श्री स्वामी समर्थ सेवा संस्था शिरूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहातसाजरा शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रेमाची बरोबरी कुणी करू शकत नाही….

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
काही दिवसांपूर्वीच कोरेगाव भीमा येथे एक माकड व तिचे पिल्लू विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले होते,त्यांच्या बरोबर असलेल्या तिसऱ्या माकडाला त्या दोघांभोवती बसलेल्या अवस्तेथ पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
त्यानंतर कोरेगाव भीमा येथील नागरिकांनी त्या मृत माकडांचा अंत्यविधी ही केला.
आज दि.२० जून रोजी सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान नगर पुना बाय पास रोड ला जानव्ही हॉटेल शेजारी असणाऱ्या ओढ्या जवळ कोणत्या तरी वाहनाने एक मोटर चालक व्यक्ती व दोन कुत्र्यांना उडवल्या मुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते आहे.
त्या अज्ञात व्यक्तीला कुणी तरी उचलून नेले,परंतु ते दोन कुत्री मात्र दिवस भर तेथे पडून आहेत.
त्या कुत्र्यां बरोबर असणारे तिसरे कुत्र मात्र दिवस भर तेथेच बसून असताना दिसत. दिवस भर अनेक वाहने व माणसे त्या रस्त्यावरून गेली,परंतु कुणी ही,त्या दोन मृत कुत्र्यांना बाजू ला ओढून टाकले नाही.
खरच दुनियेत माणुसकी जिवंत आहे का?असा प्रश्न अशा वेळी पडतो.
आजच्या धावपळीच्या जीवनात फक्त मुक्या प्राण्यांकडेच प्रेम,भावना व माणुसकी आहे का?बाकी माणूस फक्त पैसे कमवण्यात व्यस्त आहे का? हेच या मुक्या प्राण्यांकडे पाहून वाटते .

 


शिरूर नगर पालिका मुख्याधिकारी प्रितम पाटील यांना फ़ोन द्वारे माहिती सांगितली असता त्यांनी,नगर पालिकेचे कर्मचारी मनोज गुप्ता,ओमकार माने,चंद्रकांत अहिरे व गाडी पाठवून मृत कुत्रे उचलून नेण्यास मदत केली व निदान तिसऱ्या कुत्र्याला जीवन दान दिले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 1 2 1
Users Today : 29
Users Yesterday : 21