सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी च्या यशाची परंपरा कायम….

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे नॅशनल लेवल पोस्टर प्रेसेंटेशन मध्ये यश .दि. 7 व 8मार्च रोजी प्रवरा रुलर कॉलेज ऑफ फार्मसी,प्रवरानगर येथे नॅशनल लेवल कॉन्फरन्स आणि पोस्टर प्रेसेंटेशन चे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रा. मोनाली परभणी तसेच प्रा. भाग्यश्री तळवले यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्ष बी. फार्मसी चे विद्यार्थी कु. विकी होगे आणि कु. प्रवीण मांगटे या विद्यार्थ्यांनी “अँटीकोयागुलंट फिल्म ऑफ ब्रोमेलीन जिंको बायलोबा अँड लिकोरीस” या विषयावर पोस्टर प्रेझेंट करत प्रथम क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली आहे.

याप्रसंगी डॉ. के. स. लढ्ढा प्रोफेसर आयसीटी मुंबई, अंजली कटारिया क्यूसी हेड, रेव्ह फार्मा, सिन्नर, नाशिक आणि डॉ. अनिल पुंडे असिस्टंट जनरल मॅनेजर जीनोवा फार्मास्युटिकल्स,पुणे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी च्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे, सचिव धनंजयजी थिटे, डॉ. हर्षवर्धन थिटे,प्राचार्य डॉ.द्वारकादास बाहेती तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 7 8 4 1
Users Today : 23
Users Yesterday : 115