Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

साईबाबा पालखी रथ बनवण्यासाठी चारचाकी देत समाजापुढे एक नवा आदर्श

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :
शिरूर ते शिर्डी साईबाबा पालखी सोहळ्याकरीता पालखी रथ बनवण्यासाठी चारचाकी वाहन शिरूर इच्छापूर्ती साईबाबा पालखीस पिंपरी कोलंदर तालुका श्रीगोंदा अहिल्यानगर येथील दानशूर कुटुंबीयांनी भेट दिली आहे .
शिरूर शहरातील पत्रकार अनिल सोनवणे व त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी शिरूर ते शिर्डी साईबाबा पालखी सुरू करण्याची इच्छा केली होती.
गेल्या तीन वर्षापासून या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करत शिरूर ते शिर्डी साईबाबा इच्छापूर्ती पालखी सोहळा सुरू केला आहे.
या पालखी सोहळ्या त गेल्या तीन वर्षापासून दीडशे ते दोनशे महिला पुरुष लहान मुले सहभागी होत आहे. दिवसेंदिवस पालखी सोहळा वाढत असताना इच्छापूर्ती साईबाबा पालखी सोहळ्यासाठी स्वतःच्या मालकीचा चार चाकी वाहनांचा रथ असावा अशी इच्छा या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती.
त्यासाठी चार चाकी वाहन पाहण्याचे काम कार्यकर्ते करत होते अनेक वाहने पाहिली अनेक अडचणी येत होत्या. श्री साईबाबांचा पालखी सोहळा आणि इच्छा व्यक्त केली कार्यकर्त्यांनी आणि बेलवंडी फाटा शिरूर येथील एका वाहनांच्या गॅरेजमध्ये गाडी पाहण्यासाठी गेले होते. गॅरेज मालक शांताराम ओहोळ यांच्या स्वतःच्या मालकीची ही चार चाकी वाहन त्यांनी विक्री करायचे ठरवले विक्रीची किंमत ही त्यांनी इच्छापूर्ती साईबाबा पालखी सोहळ्याच्या कार्यकर्त्यांना सांगितली. आणि व्यवहार थोडा पुढे मागे होत असताना गाडीचे मालक ओहोळ यांनी वाहन श्री साईबाबांचा पालखी सोहळा करीता लागते असे म्हणत हे वाहन कुठलीही रक्कम न घेता साईबाबा पालखी सोहळ्यात मोफत देऊन टाकली.
यावेळी श्री इच्छापूर्ती साईबाबा पादुका पालखी सोहळा समिती शिरूर यांच्या वतीने शांताराम ओहोळ त्यांच्या पत्नी सौ.नंदा शांताराम ओहोळ, मुलगा अनिकेत शांताराम ओहोळ, सून श्रुतिका अनिकेत ओहोळ यांचा सत्कार करण्यात आला.
शांताराम वोव्हाळ त्यांचे चिरंजीव अनिकेत व संपूर्ण कुटुंबीय यांच्या हस्ते गाडीचे पूजन करण्यात आले व गाडी पालखी समितीला अर्पण केली.
यावेळी पालखी समितीच्या वतीने शांताराम वोव्हाळ व त्यांच्या कुटुंबीय यांचा साई प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी साई पालखी समितीचे संस्थापक अध्यक्ष अनिल सोनवणे,पत्रकार मुकुंद ढोबळे, संयोजक दादाभाऊ लोखंडे,अध्यक्ष स्वप्निल रणदिवे, रामभाऊ इंगळे, मा.उपाध्यक्ष सोनु काळुखे,कार्याध्यक्ष बंटी जोगदंड, उपाध्यक्ष तुषार भवाळ, संयोजक संदेश रासकर, ऋषी ससाने, रिया ऋषी ससाणे,बजरंग सेना अध्यक्ष उमेश शेळके,पालखी समितेचे आधार स्तंभ विकास पठारे,अजित (पप्पू)ठोंबरे,प्रकाश पठारे,अनिकेत वोव्हाळ,मोसीन तांबोळी (फिटर), संकेत पाडळे,प्रसन्न भोसले उपस्थित होते.
यावेळी श्री साईबाबांची लीला आणि दानशूर शांताराम ओहोळ यांनी चार चाकी वाहनच मोफत दिल्या मुळे सर्व साई भक्तांचा आनंद गगनात मावत नव्हता.
यावेळी प्रस्ताविक उमेश शेळके यांनी केले तर आभार स्वप्निल रणदिवे यांनी मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 2 0 0
Users Today : 138
Users Yesterday : 503