शिक्रापूर प्रतिनिधी: भरत चव्हाण
रुबी हॉल क्लिनिक शिरूर संचालित धारीवाल हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या कॅम्पमध्ये शिरूर महानगरपालिका चे कर्मचारी त्यांचे नेत्र तपासणी, रक्तदाब, बी.एम.आय., ईसीजी व मोफत आरोग्य तपासणी व वैद्यकीय सल्ला देण्यात आला या शिबिरात एकूण 150 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला
या कार्यक्रमासाठी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रीतम पाटील, डी टी बर्गे , राहुल पिसाळ व रुबी हॉल क्लिनिक शिरूर चे युनिट हेड मायकल पॉल, नेत्र तज्ञ डॉक्टर एकनाथ साळुंखे, मेजर डॉक्टर मोसिन चिडगुुपकर, डॉक्टर हरिसचंद्र प्रसाद (मेडिसिन ), हाड रोग रोग तज्ञ डॉक्टर श्रीकांत वेताळ,जनरल सर्जन डॉक्टर विशाल पानशेवडीकर, डॉक्टर विपुल अहिरे फिजिओथेरपिस्ट सुभाष नितनवरे व कल्याण भांडवलकर आधी उपस्थित होते
