जातीयवाद नष्ट करण्यासाठी सरकारने जागृत व्हावे – श्रीपाल सबनीस

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे)

छत्रपती श्री संभाजी राजांच्या इतिहासाची लिखाणामध्ये तोडफोड केली. विवेकवादी विचारसरणी प्रत्येकामध्ये असणे गरजेचे आहे. राज्यातील सद्यःची परिस्थिती पाहता सरकारला जात-धर्म नसतो.त्यामुळे राज्यातील जातीयवाद नष्ट करण्यासाठी सरकारनेच जागृत व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
श्रीशंभूराज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने आयोजित ३४५ व्या शंभूराज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते.

या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शंभूगौरव पुरस्काराने उद्योजक शिवराम थोरवे, विनायक वीर, क्रीडा क्षेत्रासाठी अभय छाजेड, सखाराम कोळसे,सनी निम्हण,संदेश आव्हाळे, विनायक वीर,शिवराम थोरवे,अभय छाजेड,सायली सुके,अक्षय आबनावे, मयुरेश पाटील,सचिन झालटे,सुरेश वांढेकर, ओंकार तुपे यांना सन्मानित
करण्यात आले.
शंभूराजेंचा जलाभिषेक ऋषिकेश पासलकर, अनिल जेधे, सिध्दार्थ कंक यांच्या हस्ते करण्यात आला.शेखर पाटील म्हणाले, छत्रपती शंभूराजेंचे कार्यकर्तृत्व आजच्या तरुणांना प्रेरणादायी आहे.छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक इतिहासकारांनी ते केले आहे. त्यांचे विचार आणि आचारासाठी सर्व अठरापगड जाती- धर्म आणि बारा बलुतेदारांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राज्यातील सद्यः परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी तरुणांनीच पुढाकार घ्यावा.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी केले. यावेळी जिल्ह्यातून शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 7 8 4 1
Users Today : 23
Users Yesterday : 115