Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

जामखेड मधे मनोज जरांगे व आ. सुरेश धस यांच्या फोटोला दुग्धाभिषेक

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी :- सागर पवार

दि.१४ रोजी वाल्मीक कराडवर पोलीस प्रशासनाने खंडणी व मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर परळीतील कराड समर्थक समाज कंटकांनी संघर्ष योद्धा मनोज (दादा) जरांगे, आ. सुरेश धस (अण्णा) आ. जितेंद्र आव्हाड, आ. प्रकाश (दादा) साळुंखे आ. संदिप भैय्या क्षिरसागर यांच्या प्रतिमेची विटंबना केली होती.

याच अनुषंगाने जामखेड येथे बहुजन समाज्याच्या वतीने आज दि. 16 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी मनोज (दादा) जरांगे व आ. सुरेश (अण्णा) धस यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की वाल्मिक कराड हा आरोपी आसुन तो गुन्हेगार आहे. त्यामुळे गुन्हेगारांना कोणती जात नसते. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे आणि ज्यांनी कराडला समर्थन देण्याचे काम केले आहे त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. बीड जिल्ह्य़ातील गुन्हे गारांचे समुळ नष्ट करण्यासाठी व आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली.

यावेळी प्रा.मधुकर राळेभात, मंगेश आजबे, गुलाब जांभळे, गणेश डोंगरे, डॉ. भारत देवकर, फिरोज कुरेशी, अवधूत पवार, प्रदिप टाफरे, संभाजी मुळे, भरत जगदाळे, गणेश आजबे, उल्हास माने, सुरज काळे, अंकुश शिंदे, तात्याराम बांदल, वसीम बिल्डर, संतोष गव्हाळे, गोरख घनवट, तात्याराम पोकळे, प्रा .लक्ष्मण ढेपे, अशोक घुमरे, पप्पू काशिद, सुनील जगताप, गणेश हागवणे, शाकीर सय्यद, तात्या जरे, दत्तात्रय सोले पाटील, भरत राळेभात यांच्या सह मोठ्या प्रमाणावर समर्थक उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 2 6 0
Users Today : 198
Users Yesterday : 503