Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

सणसवाडी येथील स्नेहल अरुण हिरे बनली सनदी लेखापाल

Facebook
Twitter
WhatsApp

शिक्रापूर प्रतिनिधी :
शिरूर तालुक्यातील सणसवाडी वाडी येथील स्नेहल अरुण हिरे हिने सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण करत , एक आगळा वेगळा आदर्श समजा पुढे ठेवला आहे.
तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यावर्षीची सनदी लेखापाल (सीए) परीक्षा नोव्हेंबर महिन्यात झाली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये सणसवाडी (ता. शिरूर) गावातील स्नेहल अरुण हिरे हिने यात नेत्रदीपक यश मिळवले आहे.
सर्व सामान्य कुटुंबातील स्नेहल हीचे माध्यमिक शिक्षण सणसवाडी येथे , उच्च माध्यमिक शिक्षण कर्वेनगर येथे,तर पदवी व पदव्युत्तर शिक्षण सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे झाले.

खासगी ऑनलाइन क्लासेस आणि स्वयंअध्ययनाच्या जोरावर तीने यश मिळवले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या स्नेहलचे सीए होण्याचे ध्येय होते. खडतर परिश्रमाने तिने ते साध्य केले. स्नेहालचे वडील अरुण हे सध्या सणसवाडी येथे खाजगी कंपनीमध्ये अधिकारी असून, आई सौ मनिषा या गृहिणी आहेत. स्नेहलच्या यशाने आई वडील आजी ,बंधू भगिनी मित्र नातेवाईक ,स्वामी समर्थ सेवेकरी परिवार या सर्वांनी तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत ,पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 8
Users Today : 6
Users Yesterday : 21